हाय गरमी..! यंदाच्या गरमीने मोडला मागील 121 वर्षांचा इतिहास; पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच सूर्य इतका तळपला की सर्वसामान्य नागरिकांना लाही लाही करून सोडले. हाच उष्णतेचा कहर एप्रिल महिन्यात ही सुरू आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच देशातील काही भागात तापमान हे 40 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. इतकेच नाहीतर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील 121 वर्षांच्या इतिहासात मार्च तिसरा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. मार्च महिन्यात संपूर्ण देशाचं सरासरी कमाल तापमान 32.65 डिग्री सेल्सिअस इतके होते. याबाबतची माहिती हवामान विभागाच्या आढावा बैठकीत समोर आली आहे.

होळीच्या दिवशी देखील मोडला रेकॉर्ड
मार्च महिन्यात होळी हा सण मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभर साजरा केला जातो. होळीच्या दिवशी देखील गरमने रेकॉर्ड मोडला आहे. मार्च महिन्यातच मे महिन्याप्रमाणे उन्हाळा जाणवला. होळीच्या दिवशी दिल्लीच्या सफदरजंग मध्ये सर्वाधिक 40.1 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 1945 नंतर मार्च महिन्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले आहे.

76 वर्षात पहिल्यांदाच मार्चमध्ये दिल्लीच्या तापमानाने 40 चा पारा गाठला आहे.हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत 1945 नंतर पहिल्यांदा इतकी उष्णतेची लाट पाहायला मिळाली. 29 मार्चला दिल्ली 40.1 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली यापूर्वी मार्च महिन्यात असं कधीच झालं नव्हतं असं हवामान जाणकारांचं म्हणणं आहे.

दरम्यान विदर्भात सहित महाराष्ट्रातील काही भागात उष्णता वाढत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ करांना देखील उष्णतेच्या तीव्र झळांच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा

दरम्यान पुढील चोवीस तासात दक्षिण-पूर्व राजस्थान, तमिळनाडू आणि पूर्व विदर्भातील नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात पुढील चोवीस तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडल्यास उष्माघाताचा सारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे आवश्यक कारणासाठीच बाहेर पडा आरोग्याची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!