शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमध्ये साडेतीन एकर ऊस जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

शेतातून गेलेल्या महावितरणच्या विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्यानंतर लागलेल्या आगीमध्ये साडेतीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे घडले आहे यामध्ये शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .

गुगळी धामणगाव येथील शेतकरी दत्तराव नलावडे यांनी गट क्रमांक 52 मध्ये मागील वर्षी उसाची लागवड केली आहे. सोमवार 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उसावरून गेलेल्या विद्युतप्रवाहीत वाहिन्यांच्या तारांमध्ये घर्षण होत ठिणग्या पडल्या. यावेळी ऊसाने पेठ घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी साडेतीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला आहे. कारखान्यास गाळपास जाण्यासाठी ऊस उभा असताना अचानक लागलेल्या आगीने या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!