Edible Oil : खाद्यतेल उत्पादनात भारत स्वयंपूर्ण होणार? 11 राज्यांत सरकारकडून पाम वृक्षारोपण मोहीम, काय होणार परिणाम?

edible oil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Edible Oil : केंद्र सरकार खाद्यतेलाच्या उत्पादनासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विविध योजनांना प्रोत्साहन दिले जात आहे. देशात ११ राज्यामध्ये मेगा ऑईल पाम वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे. देशातील विविध राज्य सरकारांनी तेल पाम प्रक्रिया कंपन्यांसह २५ जुलै २०२३ पासून मेगा ऑइल पाम लागवड मोहीम सुरू केली होती. ही मोहीम ऑगस्ट २०२३ रोजी संपली. मेगा ऑइल पाम लागवड मोहिमेमुळे २०२५-२६ पर्यंत ऑइल पाम लागवडीखालील अतिरिक्त क्षेत्रामध्ये ६.५ लाख हेक्टर वाढ करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होणार आहे. पाम लागवडीला अधिक प्रोत्साहन देणे, देश आणि शेतकरी खाद्यतेलाच्या उत्पादनात ‘स्वयंपूर्ण’ बनवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

विविध कंपन्यांनी घेतला सहभाग

आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, कर्नाटक, मिझोराम, नागालँड, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा ही प्रमुख तेल उत्पादक राज्ये या मोहिमेत सहभागी आहेत. या मोहिमेत पतंजली फूड प्रायव्हेट लिमिटेड, गोदरेज अॅग्रोव्हेट आणि 3 एफ सारख्या तेल पाम प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनी सक्रिय सहभाग घेतला. याशिवाय केई कल्टिव्हेशन आणि नवभारत या इतर प्रादेशिक कंपन्यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. या पाम लागवड मोहिमेद्वारे राज्य आणि कंपन्यांना ११ राज्यांतील ४९ जिल्ह्यांतील ७७ गावांमधील ७००० हून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता आले तसेच सुमारे ३५०० हेक्टर क्षेत्रावर ५ लाखांहून अधिक पाम झाडे लावण्यात आली आहेत.

तांत्रिक प्रशिक्षण सेमिनारचे आयोजन

या मोठ्या वृक्षारोपण मोहिमेचा एक भाग म्हणून, कंपन्यांनी विभागातील कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांसाठी तेल पाम लागवडीवर उत्कृष्ट आणि मोठ्या प्रमाणावर सखोल तांत्रिक प्रशिक्षण सेमिनार आयोजित केले होते. या चर्चासत्रांचे उद्दिष्ट शेतकरी आणि कामगारांना व्यवस्थापनाबद्दल अधिक जागरूक करणे हे होते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार लागवड साहित्य, पीक देखभाल आणि आंतरपीक यासाठी आर्थिक सहाय्यासह विविध सवलती देखील दिल्या जातात. शिवाय, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमी भावासह खात्रीशीर बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाते.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.