Tobacco Farming : केंद्र सरकारचा तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; व्याजमुक्त कर्जाची घोषणा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना (Tobacco Farming) मोठा दिलासा दिला आहे. जवळपास 15 राज्यांमध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखूची लागवड देशभरात केली जाते. यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ही प्रमुख तंबाखू उत्पादक राज्य आहेत. आंध्रप्रदेशात 3 ते 5 डिसेंबर 2023 या कालावधीत मिचॉंन्ग चक्रीवादळामुळे तंबाखू पिकाचे मोठे नुकसान झाले होते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. तर दुसरे प्रमुख राज्य असलेल्या कर्नाटकातील शेतकऱ्यांचा तंबाखू उत्पादनावरील दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना (Tobacco Farming) मोठा दिलासा मिळणार आहे.

एफसीव्ही तंबाखू म्हणजे काय? (Tobacco Farming In India)

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, फ्लू क्यूर्ड वर्जीनिया (एफसीव्ही) या तंबाखूच्या उत्पादनात देशात आंध्रप्रदेश आणि कर्नाटक ही राज्य आघाडीवर आहे. सध्या या भागांमध्ये तंबाखू पिकाची (Tobacco Farming) काढणी सुरु आहे. आंध्रप्रदेशात प्रामुख्याने 42,915 शेतकरी आहेत. तर कर्नाटकातही सध्या तंबाखू पिकाची काढणी सुरु असून, त्या ठिकाणी तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या 39,552 इतकी आहे. फ्लू क्यूर्ड वर्जीनिया (एफसीव्ही) म्हणजे तंबाखूला विक्री योग्य बनवण्याची प्रक्रिया होय. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या निर्णयाचा या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

20 टक्के क्षेत्रावरील पीक पाण्यात

3 ते 5 डिसेंबर 2023 रोजी आंध्रप्रदेशातील मिचॉंन्ग चक्रीवादळामुळे एलुरु, पूर्वी गोदावरी, काकीनाडा, प्रकाशम, नेल्लोर, बापटला, पालनाडु आणि गुंटूर या जिल्ह्यांमध्ये तंबाखू पिकाचे मोठे नुकसान झाले होते. आंध्रप्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये एकूण 75,355 हेक्टरवर तंबाखू पिकाची लागवड झाली होती. मात्र चक्रीवादळामुळे यातील 14,730 हेक्टरवरील पिकाला मोठा फटका बसला. शेतांमध्ये पाणी साचल्याने तंबाखू पीक पूर्णतः पाण्यात कुजून गेले.

कर्नाटकात विक्रीवरील दंड माफ

परिणामी, केंद्र सरकारकडून या शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जाची घोषणा केली असून, या शेतकऱ्यांचे कर्जावरील पूर्णतः माफ असणार आहे. मात्र असे असले आंध्रप्रदेशातील या शेतकऱ्यांकडून विक्रीवरील दंडाची रक्कम मात्र आकारली जाणार आहे. दरम्यान, कर्नाटकातही 2 तंबाखू उत्पादक राज्य वगळता अन्य राज्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. परिणामी केंद्र सरकारकडून कर्नाटकातील शेतकऱ्यांना तंबाखू विक्रीवरील सर्व दंड माफ करण्याचे घोषित केले आहे.

error: Content is protected !!