Toda Buffalo: शुभकार्यात महत्त्वाची तरीही तापट स्वभावाची, ‘तोडा म्हैस’, जाणून घ्या विशेषता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: तामिळनाडू राज्यात आढळणारी ‘तोडा म्हैस’ (Toda Buffalo) तेथील आदिवासी समाजासाठी महत्त्वाची आहे. तोडा या आदिवासी (Toda Tribe) जमातीच्या सांस्कृतिक जीवनामध्ये विशेषतः जन्म, मृत्यू, लग्नकार्य इ. प्रसंगांच्या वेळी या जातीच्या म्हशींना (Buffalo Breed) विशेष स्थान आहे. जाणून घेऊ या तोडा म्हशीची वैशिष्ट्ये.

उगम स्थान

तोडा म्हैस (Toda Buffalo) ही तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील नीलगिरी टेकड्यांच्या (Nilgiri Hills) टापूमध्ये आढळते. तोडा या आदिवासी जमाती कडून दूध उत्पादनांसाठी(Milk Production) ही गाय पाळली जाते. या आदिवासी जमातीच्या नावावरून या म्हशीला तोडा हे नाव पडले असावे.

शरीर रचना

इतर म्हशींपेक्षा दिसायला ह्या अगदी वेगळ्या आहेत. शरीर (धड) लांब असून त्यांची छाती विस्तृत व भरदार असते. पाय आखूड पण मजबूत असतात व त्या चांगल्याच ताकदवान असतात. शिंगे लांब आणि अर्धगोलाकार आकारात बदलणारी असतात. शिंगे पायथ्याशी जाड असून प्रथम बाहेरच्या दिशेने वळून, थोडेसे खालच्या दिशेने जातात आणि वरच्या दिशेने बाहेर पडतात. शेवटी शिंगाचे टोक आतील बाजूस वळलेले असतात ज्यामुळे शिंगांचा वैशिष्ट्य पूर्णपणे चंद्रकोर आकार किंवा अर्धवर्तुळ बनतो.  प्रौढ म्हशींमध्ये, कातडीचा मुख्य रंग भुरकट आणि राखाडी असतो. म्हशीचे (Toda Buffalo) वजन सुमारे 380 किलोपर्यंत असते.

प्रजो‍त्पादन आणि दूध उत्पादन

जवळपास 47 महिन्यात ही म्हैस (Toda Buffalo) प्रथम माजावर येते. सरासरी दूध देण्याचा कालावधी हा 200 ते 250 दिवसांचा असून एका वेतात 500 लिटर पर्यंत दूध देतात. दिवसाला 4.5 ते 7 लिटर दूध देतात.

विशेष माहिती

म्हशीची ही जात (Toda Buffalo) जास्त पाऊस आणि जास्त आर्द्रता असलेल्या भागात चांगली वाढते. या म्हशीचा स्वभाव तापट व खुनशी असतो. वन्य म्हशीप्रमाणे या माणसावर चाल करून जातात. त्यामुळे सावध राहावे लागते. सध्या या म्हशींची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आदिवासी भागात ही म्हैस संख्येने 1500 पेक्षा कमी आहे.

error: Content is protected !!