Cotton Market Rate: कापसाचे बाजारभाव अजूनही हमी भावापेक्षा कमीच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा, सोयाबीननंतर सध्या कापसाचे दरही (Cotton Market Rate) कमी झाले असून आजच्या पणन मंडळाच्या उपलब्ध माहितीनुसार आज केवळ एका बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर इतर बाजार समित्यांमध्ये चक्क ७ हजारांपेक्षा कमी दर कापसाला मिळाला. त्यातच केंद्र सरकारकडून कापसांच्या गाठीची आयात झाल्यामुळे कापसाचे दर (Cotton Market Rate) कमीच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर  करण्यात आला आहे. आज मध्यम स्टेपल, लांब स्टेपल, लोकल, ए.के.एच. ४ – लांब स्टेपल, एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल या कापसाची आवक बाजारात झाली होती. त्यामध्ये हिंगणघाट येथे आजच्या दिवसातील विक्रमी ७ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी किमान ६ हजार तर कमाल ७ हजार १७० रूपये प्रति क्विंटल एवढा कापसाला  दर (Cotton Market Rate) मिळाला. हिंगणघाट बाजार समितीमध्ये ६ हजार ५०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. 

आज अकोला बोरगावमंजू येथे सर्वांत जास्त ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून ७ हजार ४०० रूपये कमाल दर मिळाला (Cotton Market Rate). तर संगमनेर बाजार समितीमध्ये ६ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. हा आजच्या दिवसातील राज्यातील सर्वांत कमी सरासरी दर होता.

वेगवेगळ्या बाजार समितीतील प्रति क्विंटल दर (Cotton Market Rate)

संगमनेर- कमाल 6800 – किमान 5500 – सरासरी 6150

राळेगाव – कमाल 7020 – किमान 6500 – सरासरी 6900

भद्रावती- कमाल 7020 – किमान 6800 – सरासरी 6910

हिंगणा- कमाल 6650 – किमान 6650 – सरासरी 6650

आष्टी (वर्धा)- कमाल 6900- किमान 6000- सरासरी 6600

अकोला – कमाल 7021- किमान 5530- सरासरी 6275

अकोला (बोरगावमंजू) – कमाल 7400 – किमान 7100 – सरासरी 7250

उमरेड  – कमाल 6870 – किमान 6400 – सरासरी 6650

देउळगाव राजा – कमाल 7145 – किमान 6600 – सरासरी 6900

वरोरा – कमाल 7060 – किमान 6450 – सरासरी 6800

वरोरा-खांबाडा – कमाल 7100 – किमान 6450 – सरासरी 6850

काटोल – कमाल 6850 – किमान 6500 – सरासरी 6700

सिंदी(सेलू) – कमाल 7045 – किमान 6550 – सरासरी 6900

हिंगणघाट – कमाल 7170 – किमान 6000 – सरासरी 6500

हिमायतनगर – कमाल 6800 – किमान 6600 – सरासरी 6700

error: Content is protected !!