Tomato Lagwad : टोमॅटोच्या ‘या’ 3 वाणांची लागवड करा; पावसाळी हंगामात मिळेल भरघोस उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एप्रिल महिना अखेरच्या टप्प्यात असून, सध्या अनेक शेतकरी खरीप हंगामातील पावसाळी टोमॅटो लागवडीसाठी (Tomato Lagwad) लगबग करत आहे. काही शेतकरी नर्सरीत तर काही शेतकरी स्वतः बियाणे खरेदी करत टोमॅटोची रोपे तयार करत आहेत. त्यामुळे आता तुम्हीही टोमॅटो लागवडीचा विचार करत असाल. तर अधिक उत्पादन मिळवण्यासाठी टोमॅटोचे योग्य वाण निवडणे गरजेचे असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण खरीप हंगामासाठी नेमकी कोणत्या टोमॅटो वाणाची लागवड (Tomato Lagwad) करावी? कोणते तीन वाण हे अधिक उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे? त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘हे’ आहेत अधिक उत्पादन मिळवून देणारे वाण (Tomato Lagwad 3 Major Variety)

1. धनश्री टोमॅटो वाण : खरीप हंगामात लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट वाण म्हणून धनश्री टोमॅटो वाण (Tomato Lagwad) ओळखले जाते. ही एक मध्यम वाढणारी जात आहे. जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी हा वाण योग्य आहे. या वाणापासून हेक्‍टरी 50 टनपर्यंतचे उत्पादन मिळते. या वाणाचे पीक हे 160 ते 165 दिवसात परिपक्व होते. विशेष म्हणजे फळ पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास ही जात प्रतिकारक करते, ज्यामुळे अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होते.

2. फुले राजा टोमॅटो वाण : फुले राजा टोमॅटो वाण हे लागवडीनंतर 180 दिवसांमध्ये परिपक्व होते. या वाणाचे टोमॅटो लांबच्या बाजारपेठेसाठी योग्य असतात. या वाणापासून हेक्‍टरी 60 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळते. टोमॅटोचे हे वाण फळे पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या विद्यापीठाने विकसित केले आहे.

3. फुले केसरी टोमॅटो वाण : फुले केसरी टोमॅटो वाणाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. या वाणाची खरीप हंगामात लागवड केल्यास अधिकचे उत्पादन मिळते. या वाणाच्या टोमॅटोचा रंग केसरी असल्याने या वाणाला ‘फुले केसरी’ म्हणून ओळखले जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या विद्यापीठाने ही जात विकसित केली आहे. या जातीपासून सरासरी 55 ते 57 एवढे विक्रमी उत्पादन मिळते.

error: Content is protected !!