Tomato Market Rate : टोमॅटोच्या दरात वाढ; पहा ‘किती’ मिळतोय भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या टोमॅटोच्या दरात वाढ (Tomato Market Rate) पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण बाजारात समितीत बुधवारी (ता.22) टोमॅटोला सर्वाधिक कमाल 4000 रुपये तर किमान 3400 रुपये प्रति क्विंटलचा (800 ते 680 रुपये प्रति जाळी) दर मिळाला आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Tomato Market Rate) कमाल 3500 रुपये ते किमान 2500 रुपये प्रति क्विंटलचा (700 ते 500 रुपये प्रति जाळी) दर मिळाला आहे. त्यामुळे आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांमधील टोमॅटोच्या दर पुढीलप्रमाणे आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल बाजार समितीत टोमॅटोला कमाल 3000 ते किमान 2800 रुपये प्रति क्विंटलचा (600 ते 540 रुपये जाळी) दर मिळत आहे. पुण्यातील पिंपरी बाजार समिती व नागपूर जिल्ह्यातील कामठी बाजार समितीत टोमॅटोला संयुक्तपणे कमाल 3000 ते किमान 2000 रुपये प्रति क्विंटलचा (600 ते 400 रुपये जाळी) दर मिळाला आहे. औरंगाबाद बाजार समितीत टोमॅटोला कमाल 3000 ते किमान 1200 रुपये प्रति क्विंटलचा (600 ते 240 रुपये जाळी) दर मिळाला आहे. कोल्हापूर बाजार समितीत टोमॅटोला कमाल 3000 ते किमान 1000 रुपये प्रति क्विंटलचा (600 ते 200 रुपये जाळी) दर मिळाला आहे. सातारा, नागपूर व नाचणे (रत्नागिरी) बाजार समितीत टोमॅटोला संयुक्तपणे कमाल 2500 ते किमान 2000 रुपये प्रति क्विंटलचा (500 ते 400 रुपये जाळी) दर मिळाला आहे.

कमी दर मिळालेल्या समित्या

सोलापूर बाजार समितीत कमाल 2500 ते किमान 300 रुपये प्रति क्विंटलचा (500 ते 60 रुपये जाळी) दर मिळाला आहे. अमरावती बाजार समितीत टोमॅटोला किमान 2000 ते कमाल 1600 रुपये प्रति क्विंटलचा (400 ते 320 रुपये जाळी) दर मिळाला आहे. राहाता बाजार समितीत टोमॅटोला कमाल 2000 रुपये ते किमान 1000 रुपये प्रति क्विंटलचा (400 ते 200 रुपये जाळी) दर मिळाला आहे. जळगाव व पुणे येथील स्थानिक बाजार समितीत संयुक्तपणे टोमॅटोला किमान 2500 ते कमाल 1000 रुपये प्रति क्विंटल (500 ते 200 रुपये जाळी) दर मिळाला आहे. श्रीरामपूर बाजार समितीत टोमॅटोला कमाल 1500 ते किमान 1000 रुपये प्रति क्विंटल (300 ते 200 रुपये जाळी) दर मिळाला आहे.

error: Content is protected !!