शेतकऱ्याचा नादच खुळा! एका दिवसातच टोमॅटो विक्रीतून कमावले तब्बल 38 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato News : सध्या टोमॅटोच्या दराने उच्चांकी गाठली आहे. टोमॅटोच्या दराने २०० रुपयाचा आकडा पार केला आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र टोमॅटोचे वाढते दर पाहता सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. सध्या दररोज टोमॅटोचीच चर्चा होताना दिसत आहे. दररोज टोमॅटो संबधी अनेक बातम्या देखील समोर येत आहेत. सध्या देखील एक अशीच बातमी समोर आली आहे. जी वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

टोमॅटोचे दर जरी वाढले असले तरी देखील शेतकऱ्यांना जास्त फायदा होत नसल्याचा आरोप मागच्या काही दिवसापासून करण्यात येत आहे. मात्र आता शेतकरी त्याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी एकाच दिवसात 38 लाख रुपये कमावले आहेत. तुम्हालाही वाचून धक्का बसला ना? मात्र हे खरे आहे. कर्नाटकमधील कोलार येथील एका शेतकऱ्याने एका दिवसात टोमॅटो विक्रीतून तब्बल 38 लाख रुपये कमावले आहेत. त्यामुळे सगळीकडे या शेतकऱ्याची चर्चा होताना दिसत आहे.

बाजारभाव कुठे पाहणार?

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला टोमॅटो किंवा इतर शेतीमालाचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर लगेचच प्लेस्टोअरवर जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही दररोजचा बाजारभाव चेक करू शकता. त्याचबरोबर, सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, हवामान अंदाज आदींची माहिती तुम्हाला या अँपमध्ये मिळू शकते. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच hello krushi हे अँप डाउनलोड करा.

रिपोर्टनुसार, कर्नाटकमधील (Karnataka) कोलार येथील एका शेतकरी कुटुंबाने एकूण 2000 टोमॅटोच्या पेट्या विक्री केल्या. आणि त्यामधून त्यांना एकूण 38 लाख रुपये मिळाले आहेत. प्रभाकर गुप्ता असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्याकडे जवळपास 40 एकर जमीन आहे. प्रभाकर गुप्ता आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या 40 वर्षांपासून जमीन कसत असून यंदा त्यांना टोमॅटोने चांगले मालामाल केले आहे.

error: Content is protected !!