Tomato Rate : सध्या टोमॅटोची प्रत्येक घरात चर्चा होत आहे. वाढलेल्या दरांमुळे टोमॅटो सर्वसामान्यांच्या ताटातून जणू काही गायब झाला आहे. एकेकाळी टोमॅटोला चांगला भाव मिळत नसल्याने त्याला रस्त्यावर फेकून देण्याची वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली होती. परंतु देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने याचा परिणाम टोमॅटोवर झाला. बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात येऊ लागला आहे.
मागणी जास्त आणि उत्पादन कमी असल्याने टोमॅटोचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकरी टोमॅटो विकून लखपती तर काही करोडपती होत आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून एक दोन लाख नव्हे तर एकूण 2.8 कोटी रुपये कमावले आहेत. यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली. (Tomato Rate)
या शेतकऱ्याला (Farmer) 2021 मध्ये टोमॅटोचे दर घसरल्याने त्याला 20 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. परंतु नुकसान झाले तरीही त्याने जिद्द सोडली नाही. ईश्वर गायकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यावर्षी त्याने 12 एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली असून त्यांचा 35 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्यातुन ते अवघ्या 25 दिवसांत करोडपती झाले आहे. अजूनही त्यांच्याकडे 4 हजार कॅरेट्स टोमॅटो शिल्लक असून त्यातून त्यांना आणखी 3.5 कोटी रुपयांची कमाई होईल, अशी अपेक्षा आहे
गायकर यांनी आतापर्यंत 17 हजार कॅरेट टोमॅटोची विक्री केली आहे. त्यांना प्रत्येक कॅरेटची किंमत 770 ते 2311 रुपये इतकी मिळाली. एकेकाळी कवडीमोल भावात विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला चांगला भाव मिळाला आहे. त्यांच्या त्या घवघवीत यशामुळे संपूर्ण गायकर कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गायकर कुटुंब 2017 सालापासून टोमॅटोची लागवड करत आहेत. परंतु यंदाच्या वर्षी त्यांना खूप मोठी लॉटरी लागली आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्हालाही घरबसल्या टोमॅटो किंवा इतर शेतमालाचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर लगेच प्ले स्टोअरला जा आणि Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला रोजचा बाजारभाव पाहायला मिळेल. त्याचबरोबर अजून बऱ्याच शेतीविषय उपयुक्त गाष्टींची माहिती या अँपमध्ये आहे. त्यामुळे लगेचच हे अँप इंस्टाल करा