Tomato Rate : टोमॅटोचे दर अजून वाढले, 22 किलोचा क्रेट विकला जातोय 2500 रुपयांपर्यंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato Rate : सध्या टोमॅटोच्या दराने उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) आनंदात असून शहरी भागात राहणाऱ्या लोकांचे बजेट कोलमडले आहे. टोमॅटोचे दर हा विषय संपूर्ण देशातच चर्चेचा विषय बनला आहे. टोमॅटोचे दर दररोज नवा आकडा गाठत आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील काही शहरांमध्ये 22 किलोच्या टोमॅटोच्या क्रेटचा भाव अडीच हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव 200 रुपये किलोपर्यंत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मालामाल झाले आहेत.

पावसामुळे महाग झालेल्या भाज्या सर्वसामान्यांच्या ताटापासून दूर जात आहेत. अनेकजणांच्या भाजीतून टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना तर टोमॅटोची राखण करावी लागत आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे चोरटयांनी देखील धुमाकूळ घातला आहे. बऱ्याच ठिकाणी टोमॅटो चोरीला गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. (Tomato Rate 🙂

तुम्हाला जर रोजचे बाजारभाव चेक करायचे असतील तर आम्ही तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला सोप्या पद्धतीने बाजारभाव चेक करता येतील. तुम्हाला पहिल्यांदा प्ले स्टोअरवर जावे लागेल त्या ठिकाणी Hello Krushi असे सर्च करून अँप इंस्टाल करावे लागेल. हे अँप इंस्टाल झाल्यावर तुम्ही रोजचे बाजारभाव अगदी मोफत पाहू शकता. त्याचबरोबर सरकारी योजनांची माहिती, हवामान अंदाज आणि अन्य कृषीबद्दल माहिती तुम्ही या अँपमधून जाणून घेऊ शकता. त्यामुळे लगेचच Hello Krushi हे अँप डाउनलोड करा.

मागच्या महिनाभरापासून टोमॅटोचे भाव वाढत आहेत. महागड्या टोमॅटोमुळे स्वयंपाकघराचे बजेट वाढले आहे. हिमाचल प्रदेशातील बाल्ह व्हॅली भागात टोमॅटोचा 22 किलोचा क्रेट 2,500 रुपयांपर्यंत विकला जात आहे. त्याचबरोबर उंच हायब्रीड टोमॅटो दोन हजार रुपये प्रति क्रेट दराने विकला जातोय. पिकांचे नुकसान झाल्याने टोमॅटोचे भाव वाढले आहेत असे कृषी तज्ञ सांगत आहेत. ३० टक्क्यांहून अधिक टोमॅटोचे पीक नष्ट झाल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भाववाढीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर भरून निघेलच, शिवाय अतिरिक्त नफा देखील मिळेल. शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, पूर्वी हा क्रेट जास्तीत जास्त 1800 रुपयांपर्यंत विकला जात होता, मात्र आता तो 2600 रुपयांपर्यंत विकला जात आहे.

शेतमाल : टोमॅटो (Tomato Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/07/2023
कोल्हापूरक्विंटल158100080004500
पुणे-मांजरीक्विंटल3874500110008100
औरंगाबादक्विंटल76450095007000
पाटनक्विंटल7350055004500
श्रीरामपूरक्विंटल15160049003800
नवापूरक्विंटल88400090006409
साताराक्विंटल13500070006000
मंगळवेढाक्विंटल641800100007700
पंढरपूरहायब्रीडक्विंटल5250090007000
कल्याणहायब्रीडक्विंटल39600100009800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60600065006250
पुणेलोकलक्विंटल824300090006000
पुणे- खडकीलोकलक्विंटल11300060004500
पुणे-मोशीलोकलक्विंटल89600080007000
नागपूरलोकलक्विंटल5005000100009000
पेनलोकलक्विंटल90800090008000
वाईलोकलक्विंटल80250090005500
पारशिवनीलोकलक्विंटल117000110009000
कामठीलोकलक्विंटल88000100009000
पनवेलनं. १क्विंटल580800090008500
मुंबईनं. १क्विंटल162800090008500
रत्नागिरीनं. १क्विंटल19300090006500
सोलापूरवैशालीक्विंटल335100095005000
जळगाववैशालीक्विंटल35350070005200
नागपूरवैशालीक्विंटल30080001200011000
कराडवैशालीक्विंटल69700080008000
error: Content is protected !!