Tomato Rate : टोमॅटोचे दर भिडले गगनाला! ‘या’ राज्यात 240 रुपये किलोने मिळतोय टोमॅटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato Rate : सध्या टोमॅटोचे (tomato) दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोने उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) तर महागाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. देशातील सर्वात महाग टोमॅटो उत्तराखंडमध्ये विकला जात असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत पैसे असलेले लोकच टोमॅटो खरेदी करत आहेत. महागाईचा प्रश्न म्हणजे उत्तराखंडमध्ये टोमॅटोच्या भावाने २०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. (Latest Marathi News)

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या गंगोत्री धाममध्ये एक किलो टोमॅटोची किंमत 250 रुपये झाली आहे. तर उत्तरकाशी जिल्ह्यात टोमॅटो 180 ते 200 रुपये किलोने विकला जात आहे. लोक 250 ग्रॅमपेक्षा जास्त टोमॅटो खरेदी करू शकत नाहीत. विशेष म्हणजे भाव वाढल्याने टोमॅटोही भाजीच्या गाड्यातून गायब झाले आहेत. (Tomato Rate)

टोमॅटोचे भाव वाढल्याने त्यांची कमाई कमी झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. ग्राहक टोमॅटो खरेदी करत नाहीत. टोमॅटोच्या भावात वाढ होण्यासाठी अनेकजण पावसाला जबाबदार धरत आहेत. पावसामुळे टोमॅटोचे उत्पादक कमी झाले आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर वाढले असल्याचे बोलले जात आहे.

पावसामुळे टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त झाल्याने टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली. दरम्यान, चेन्नईत देखील टोमॅटो १०० ते १३० रुपये किलोने विकला जात आहे. तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी चेन्नईतील रेशन दुकानांवर ६० रुपये किलो दराने टोमॅटो विकण्यास सुरुवात केली आहे.

शेतमाल : टोमॅटो (Tomato Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/07/2023
कोल्हापूरक्विंटल123100090005000
औरंगाबादक्विंटल115450095007000
राहूरीक्विंटल26100050003000
नवापूरक्विंटल90500085006733
विटाक्विंटल45600070006500
साताराक्विंटल44400070005500
मंगळवेढाक्विंटल39250095008600
राहताक्विंटल13300060004500
पंढरपूरहायब्रीडक्विंटल9150080005500
कल्याणहायब्रीडक्विंटल3150001700016000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल15804590008565
रामटेकहायब्रीडक्विंटल588000100009000
पुणेलोकलक्विंटल1372300090006000
पुणे- खडकीलोकलक्विंटल4300070005000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1700070007000
पुणे-मोशीलोकलक्विंटल233500090007000
नागपूरलोकलक्विंटल50070001100010250
वडगाव पेठलोकलक्विंटल47300060004000
पेनलोकलक्विंटल84100001200010000
वाईलोकलक्विंटल80250090006500
कामठीलोकलक्विंटल158000100009000
पनवेलनं. १क्विंटल535700075007250
मुंबईनं. १क्विंटल1097700085007800
रत्नागिरीनं. १क्विंटल18300090006000
सोलापूरवैशालीक्विंटल3011000105005500
जळगाववैशालीक्विंटल35300070004000
नागपूरवैशालीक्विंटल400700090008500
भुसावळवैशालीक्विंटल3500060005500
error: Content is protected !!