धक्कादायक बातमी! टोमॅटोने भरलेला पिकअप रस्त्यावर पलटी; नागरिकांची टोमॅटो लुटण्यासाठी गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato Rate : मागच्या काही दिवसापासून टोमॅटोला चांगले दर मिळत असल्याने टोमॅटोच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी कमावले टोमॅटो मधून लाखो करोडो रुपये तसेच शेतकऱ्यांचे टोमॅटो गेली चोरीला अशा अनेक बातम्या टोमॅटोचे भाव वाढल्यापासून ऐकायला मिळत आहेत. दरम्यान सध्या टोमॅटो बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झारखंड मधील हजारीबाग येथील चर्ही खोऱ्यात रविवारी 6 ऑगस्ट रोजी टोमॅटो ने भरलेला पिकअप पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.

टोमॅटो लुटण्यासाठी मोठी गर्दी

या घटनेबाबत तेथील आसपासच्या नागरिकांना माहिती मिळताच काही वेळातच टोमॅटो लुटण्यासाठी तेथे मोठा जमाव जमला. लोकांनी आपापल्या टोपल्या पिशव्या घेऊन त्या ठिकाणी टोमॅटो लुटण्यास सुरवात केली आणि टोमॅटो नी भरलेली टोपली घेऊन गेले. सध्या टोमॅटोला २६० रुपये किलोचा दर मिळत आहे त्यामुळे झारखंडच्या हजारीबाग मध्ये टोमॅटो ने भरलेला पिकअप पलटी होताच लोकांमध्ये टोमॅटो लुटण्याची स्पर्धा सुरू झाली. (Tomato Rate)

रविवारी 6 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. टोमॅटोला भाव जास्त असल्याने टोमॅटो लुटण्यासाठी त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. लोक आपापल्या पद्धतीने कोणी पिशव्यात टोमॅटो घेऊन जात होते तर कोणी टोपल्यात टोमॅटो घेऊन जात होते. टोमॅटो लुटू नका असं चालकाने आणि तेथील काही मदतनीस लोकांनी लुटारूंना सांगितले मात्र त्यांचे कोणी ऐकले नाही. ज्याच्या हाताला लागला त्यांनी जमेल तेवढा टोमॅटो वाहून नेला आहे.

पोलिसांची घटनास्थळी दाव

या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा पिकअप रस्त्यावर उलटल्यामुळे तेथील वाहतूक सेवा देखील ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पिकअप रस्त्यावरून हटवला आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली

दरम्यान, तेलंगणामध्ये तर टोमॅटो न भरलेल्या ट्रक रस्त्यावर उलटला मात्र टोमॅटो चोरीला जातील या भीतीने ट्रक मालकाने थेट पोलिसांकडे धाव घेतली असून यासाठी पोलीस संरक्षण द्यावे असे आवाहन केले. त्यानंतर मालकाच्या विनंतीवरून पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यात आले आणि पोलिसांच्या देखरेखेखाली हे टोमॅटो गोळा करण्यात आले.

error: Content is protected !!