Tomato Rate : नादच खुळा! टोमॅटो विकून शेतकऱ्याने फेडले दीड कोटींचे कर्ज, कमाई ऐकून बसेल धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato Rate : महागाईने सर्व सामान्य जनता हैराण झाली आहे तर भाज्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न या महागाईत अनेक पटींनी वाढले आहे. टोमॅटोमुळे देशामध्ये अनेक शेतकरी मालामाल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोमधून लाखो करोडो रुपये कमावले आहेत. यामध्येच आता आंध्रप्रदेशमधील एक शेतकरी देखील चांगलाच चर्चेत आला आहे. ४८ वर्षीय शेतकरी मुरली सध्या चर्चेत आहे, मुरलीने अवघ्या काही दिवसांत टोमॅटो विकून 4 कोटी रुपये कमावले. त्यामुळे या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. (Agriculture News)

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

माहितीनुसार, शेतकरी मुरली हा आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मागच्या अनेक वर्षांपासून हा शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहे. मात्र याआधी त्याला कधीच टोमॅटोमधून एवढा नफा मिळाला नव्हता. पण यावेळी या शेतकऱ्याने चांगला नफा मिळवला आहे. मागच्या वर्षी शेतकऱ्याचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यासाठी त्याने सावकाराकडून कर्ज घेऊन शेती केली. मात्र यावेळी टोमॅटो विकून शेतकरी चांगलाच मालामाल झाला आहे. टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे काही दिवसांत टोमॅटो विकून या शेतकऱ्याने चार कोटी रुपये कमावले आहेत.

यामध्ये महत्वाचं म्हणजे, एवढे पैसे कमविण्यासाठी त्या शेतकऱ्याला मोठी मेहनत करावी लागली आहे. टोमॅटो विकण्यासाठी त्यांना दररोज 130 किलोमीटरहून अधिक अंतर कापावे लागत होते. त्याला चांगला भाव मिळावा म्हणून कोलार येथे टोमॅटो विकण्यासाठी जात असे. विशेष बाब म्हणजे दीड कोटी रुपयांचे कर्ज फेडल्यानंतर मुरली अवघ्या 45 दिवसांत 2 कोटी रुपये कमवू शकला आहे. त्यामुले सध्या या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. (Tomato Rate)

जमीन खरेदी करण्याचा विचार

सध्या टोमॅटोमधून शेतकऱ्याला चांगला नफा मिळाल्याने शेतकरी आता अधिक क्षेत्रात टोमॅटोची लागवड करण्याचा त्यांचा विचार आहे. आता त्याला शास्त्रोक्त तंत्राचा अवलंब करून बागायती पद्धतीने टोमॅटोची लागवड करायची आहे, जेणेकरून चांगले उत्पादन मिळेल. विशेष म्हणजे अधिक क्षेत्रात शेती करण्यासाठी मुरली गावातच अजून जास्त जमीन खरेदीचा विचार करत आहे.

शेतमाल : टोमॅटो Tomato Rate

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/08/2023
कोल्हापूरक्विंटल78300090006000
अहमदनगरक्विंटल1433000100006500
औरंगाबादक्विंटल1146000100008000
चंद्रपूर – गंजवडक्विंटल750350070005000
राहूरीक्विंटल24100080004500
खेड-चाकणक्विंटल1487000100008500
श्रीरामपूरक्विंटल14170020001800
साताराक्विंटल27500090007000
राहताक्विंटल362500110007000
हिंगणाक्विंटल2500050005000
कल्याणहायब्रीडक्विंटल3100001200011500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल15606570006535
रामटेकहायब्रीडक्विंटल64100001200011000
पुणेलोकलक्विंटल12433000100006500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1700070007000
पुणे-मोशीलोकलक्विंटल184400080006000
नागपूरलोकलक्विंटल650500090008250
वाईलोकलक्विंटल704000110007000
मंगळवेढालोकलक्विंटल18160086007700
कामठीलोकलक्विंटल20550065006000
पनवेलनं. १क्विंटल3398000100009000
मुंबईनं. १क्विंटल1040750080007800
रत्नागिरीनं. १क्विंटल158000100009000
सोलापूरवैशालीक्विंटल296100060004000
जळगाववैशालीक्विंटल155000100007500
उस्मानाबादवैशालीक्विंटल35180080004900
नागपूरवैशालीक्विंटल500500080007000
भुसावळवैशालीक्विंटल1125001250012500
error: Content is protected !!