Tomato : काय सांगत! टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; शेतातच बसविले सीसीटीव्ही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato Rate : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे टोमॅटोची चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. दररोज कुठे ना कुठे शेतकऱ्याचे टोमॅटो चोरी गेल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये रात्रीच्या वेळी देखील पहारा करावा लागत आहे. दिवसभर काम करून रात्र देखील जागून काढावी लागत आहे. दरम्यान आता सध्या एक शेतकरी चर्चेचा विषय ठरत आहेत. औरंगाबादच्या एका शेतकऱ्याने टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून चक्क आपल्या टोमॅटोला सीसीटीव्ही लावला आहे. यामुळे शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

22 हजार रुपये खर्च करून बसवले सीसीटीव्ही

या शेतकऱ्याचा दीड एकर टोमॅटो असून या शेतकऱ्याने संपूर्ण शेतीभोवती सीसीटीव्ही बसवले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्याने ही शक्कल लढवली आहे. शरद रावते असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने टोमॅटो शेतीमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी जवळपास 22 हजार रुपये खर्च केले आहेत त्यामुळे परिसरात सध्या या घटनेची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

टोमॅटोचे दर पाहणे झाले सोपे (Tomato Rate )

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचे टोमॅटोचे दर पाहायचे असतील तर आताच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये टोमॅटोचा बाजार भाव पाहू शकता. टोमॅटोला तुमच्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती भाव मिळतोय? याबाबतची माहिती तुम्हाला एका मिनिटात मिळेल त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.

मागच्या काही दिवसापासून टोमॅटोला चांगले दर मिळत असून अनेक ठिकाणी 200 रुपये किलोवर जाऊन दर पोहोचले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगलेच मालामाल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी लाखो करोडो रुपये टोमॅटो विकून कमवले आहेत/ मात्र टोमॅटोला जास्तीचा दर मिळत असल्याने यावर चोरांची नजर पडली आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील शहापूर या ठिकाणच्या शरद रावते यांच्या शेतामधील टोमॅटो चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या गोष्टीला आळा बसण्यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवत चक्क टोमॅटोच्या पिकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

चोरीच्या घटनांनी वैतागले शेतकरी

फक्त औरंगाबादच नव्हे तर अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. दिवस-रात्र कष्ट करून शेतातील उभे पिक चोरटी चोरून नेत असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अनोखी शक्कल लढवून चोरीला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या टोमॅटोला चांगले दर मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची देखील शक्यता आहे. मात्र रात्रीच्या सुमारात टोमॅटोची चोरी होत असल्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामुळे शेतकरीही वैतागले आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांनी रात्रीचा मुक्काम शेतात करण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर काही शेतकरी आता यावर सीसीटीव्हीचा पर्याय देखील शोधत आहेत

error: Content is protected !!