Tomato Rate : टोमॅटोचे दर कमी झाल्याने शेतकरी संतापला; थेट बाजारसमितीमध्येच टोमॅटो दिले फेकून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato Rate : गेल्या एक महिन्याभरापूर्वी टोमॅटोच्या दराने चांगली उच्चांकी गाठली होती. टोमॅटोला जवळपास 200 रुपये किलो दराने विकले जात होते. त्यामुळे अनेक शेतकरी लखपती ते करोडपती झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते मात्र. आता शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. दोनशे रुपये दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला आता कवडीमोल भाव मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्याने संतप्त झालेल्या एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने टोमॅटो फेकून देत आपला संताप व्यक्त केला आहे. हा सर्व प्रकार लासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडला आहे. याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेट ला फक्त 50 ते 100 रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे शेतकरी चांगलाच संतापला असून त्याने टोमॅटो संताप व्यक्त केला आहे.

टोमॅटोला सध्या किती बाजार भाव मिळतोय?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सध्याचे टोमॅटोचे बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपले हॅलो कृषी हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा या ॲपच्या माध्यमातून तुम्ही मेट्रोचे दररोज चे बाजार भाव पाहू शकता यामध्ये तुम्ही फक्त बाजार भाव नाही तर रोजचा रोज हवामान अंदाज सरकारी योजना पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत मिळू शकता. त्यामुळे लगेचच हे अँप इंस्टाल करा.

गांजाच्या शेतीला परवानगी द्या

मागचा दीड महिन्यापासून राज्यभर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी फळबाग जगवण्यासाठी तसेच शेतातील शेतमाल जगवण्यासाठी टँकरच्या साह्याने पाणी देत आहेत. या शेतकऱ्याने देखील टँकरच्या साह्याने टोमॅटोला पाणी दिले मात्र. आजच्या दरामध्ये उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजूरचा खर्च निघणे देखील मुश्किल झाल्याने गांजाच्या शेतीला परवानगी द्या अशी मागणी आता टोमॅटो उत्पादक शेतकरी करत आहेत.

error: Content is protected !!