धक्कादायक घटना! दरोडेखोरांनी शेतकऱ्याची टोमॅटोची भरलेली गाडी नेली चोरून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : सध्या सगळीकडे टोमॅटोच्या दराची चर्चा होत आहे. टोमॅटोच्या दराने शहरी भागातील लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. शहरी भागातील लोकांचे बजेट कोलमडले असले तरी शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी यातून लाखोंचा नफा कमवत असल्याचे दिसत आहे. मागच्या काही दिवसापासून टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे टोमॅटो चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे टोमॅटो चोरीला गेलेल्या घटना घडल्या आहेत. सध्या देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

कर्नाटकातील बंगळुरू मध्ये टोमॅटोने भरलेली गाडीच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाम्प्त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर येथील एक शेतकरी शनिवारी मध्यरात्री टोमॅटो घेऊन बाजारात चालला होता. यावेळी जाताना शेतकऱ्याची बोलेरो गाडी एका दुसऱ्या कारला धडकली आणि समोरील कारची काच तुटली. यामुळे कारचालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कारचालकाने शेतकऱ्याकडे नुकसानीपोटी १० हजार रुपये मागितले. (Tomato News)

त्यानंतर कारचालकाने शेतकऱ्याला जबरदस्तीने गाडीच्या बाहेर येण्यास सांगितले. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि कारचालक शेतकऱ्याची गाडी घेऊन पळाला. शेतकऱ्याने याबाबत लगेच पोलिसात तक्रार दाखल केली त्यांनी तक्रारीमध्ये आपले दोन लाखाचे टोमॅटो चोरीला गेल्याचे म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी लगेचच आरोपींचा शोध घेतला असून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचा टोमॅटो दर पाहायचा आहे तर लगेच प्ले स्टोअरला जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. यामध्ये तुम्ही दररोजचा टोमॅटोचा भाव त्याचबरोबर इतर शेतमालाचा बाजारभाव पाहू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इंस्टाल करा

error: Content is protected !!