Tomato Variety : टोमॅटोच्या ‘अर्का रक्षक’ वाणाची लागवड करा; हेक्टरी मिळेल 80 टन उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये टोमॅटो पिकाचे (Tomato Variety) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे पावसाळी हंगामात लवकर लागवड केलेल्या टोमॅटोला अधिक दर मिळतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात अनेक शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. टोमॅटो लागवडीसाठी रोपे तयार कारण्याची शेतकऱ्यांची लगबग मार्च-एप्रिल महिन्यातच सुरु होते. त्यामुळे आता तुम्हीही यंदा लवकर टोमॅटो लागवडीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टोमॅटोचे ‘अर्का रक्षक’ हे वाण लागवडीसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. त्यामुळे आज आपण आगामी पावसाळी टोमॅटोच्या लागवडीच्या दृष्टीने ‘अर्का रक्षक’ या टोमॅटो वाणाबाबत (Tomato Variety) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

रोगांना बळी पडत नाही (Tomato Variety Arka Rakshak For Farmers)

अर्का रक्षक ही टोमॅटो जात (Tomato Variety) अधिक उत्पादन देणारी एफ-1 संकरित जात मानली जाते. जी टोमॅटोवरील प्रमुख रोगांना कधीही बळी पडत नाही. यामध्ये अर्का रक्षक हे वाण शेतकऱ्यांमध्ये टोमॅटोवरील ‘घुबडा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोगास बळी पडत नाही. त्यालाच पर्णगुच्छ किंवा लीफकर्ल रोग असेही म्हणतात. याशिवाय टोमॅटोवरील भुरी रोग आणि करपा रोग या रोगांना देखील हे अर्का रक्षक टोमॅटो वाण बळी पडत नाही. परिणामी, इतर टोमॅटो वाणांच्या तुलनेत रोगप्रतिकारक्षम असल्याने, या वाणाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादन मिळण्यास मदत होते. अर्का रक्षक हे वाण प्रामुख्याने 140 दिवसांमध्ये तोडणीला येते. तसेच वाणाच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 80 टन इतके उत्पादन मिळते. या वाणाचे टोमॅटो फळ हे मोठे आणि भडक लाल रंगाचे असते.

अर्काच्या अन्य वाणांची खासियत

1. अर्का अभिजीत : अर्का अभिजीत या टोमॅटो वाणाच्या (Tomato Variety) झाडांची पाने गडद हिरवी असतात. त्याची फळे गोलाकार व मध्यम आकाराची असतात. तसेच वाणाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सुमारे 3 आठवड्यापर्यंत खराब होत नाही. ज्यामुळे टोमॅटो एक्स्पोर्टसाठी हे वाण सर्वोत्तम मानले जाते. हे वाण खरीप आणि रब्बी हंगामात 140 दिवसांत तोडणीला येते.

2. अर्का विशेष : अर्का विशेष या टोमॅटो वाणाचा वापर टोमॅटो प्युरी, टोमॅटो पेस्ट, टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस बनवण्यासाठी केला जातो. हे वाण देखील अर्काची एक महत्त्वाची जात आहे. या वाणाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना हेक्टरी 750 ते 800 क्विंटल उत्पादन मिळू शकते. या वाणाच्या एका फळाचे वजन 70 ते 75 ग्रॅम इतके असते.

३ . अर्का अभेद : अर्का अभेद वे वाण टोमॅटोचे संकरित वाण आहे. या वाणाच्या टोमॅटो झाडांची पाने गडद हिरवी असतात. हे टोमॅटो वाण 140 ते 150 दिवसांत तोडणीस येते. त्याच्या एका फळाचे वजन 90 ते 100 ग्रॅम इतके असते. या जातीच्या टोमॅटोची लागवड केल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी 70 ते 75 टन उत्पादन मिळू शकते. या जातीची रोग प्रतिकारशक्ती देखील उत्तम आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते.

error: Content is protected !!