Tomato Variety : ‘या’ टोमॅटो वाणांची लागवड करा; मिळेल विक्रमी उत्पादन; वाचा…सविस्तर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा पावसाळा महिनाभरावर (Tomato Variety) येऊन ठेपला आहे. त्यातच हवामान विभागाने यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडणार असल्याचे आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यांची पीक नियोजनाची लगबग सुरु झाली आहे. अनेक जण सध्या कोणते टोमॅटो वाण निवडावे? याबाबत चर्चा करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता तुम्हीही यंदाच्या पावसाळी हंगामात टोमॅटोची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आज आपण टोमॅटोच्या पावसाळी हंगामात लावता येणाऱ्या काही प्रमुख जातींची (Tomato Variety) माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांनी प्रामुख्याने आपल्या टोमॅटोची लागवड (Tomato Variety) करताना काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने पावसाळी हंगामातील टोमॅटो लागवडीसाठी तुमच्या जमिनीच्या मगदूराप्रमाणे, स्थानिक हवामानानुसार योग्य जातींची निवड करणे आवश्यक राहणार आहे. त्यासाठी तुम्ही स्थानिक कृषी सेवा केंद्र चालकाचा किंवा कृषी तज्ञांचा सल्ला घेऊ शकतात. किंवा मग योग्य त्या शिफारस करण्यात आलेल्या वाणांची निवड करू शकतात.

टोमॅटोच्या काही प्रमुख जाती (Tomato Variety)

पुसा रुबी : पुसा रूबी हा टोमॅटोचा एक सुधारित वाण असून याची पावसाळी हंगामात लागवड करता येणे शक्य आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीची तिन्ही हंगामात लागवड करता येणे शक्य आहे. या जातीचे पीक तीन महिन्यात हार्वेस्टिंगसाठी तयार होते. या जातीपासून हेक्टरी 325 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

पुसा गौरव : हा देखील टोमॅटोचा एक सुधारित प्रकार आहे. या जातीची देशातील अनेक प्रमुख टोमॅटो उत्पादक भागांमध्ये लागवड पाहायला मिळते. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 400 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातोय.

पुसा शितल : पुसा शितल या जातीची देखील देशातील अनेक राज्यांमध्ये लागवड केली जाते. या जातीपासून हेक्टरी 350 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातोय.

अर्का गौरव : या जातीचे टोमॅटो गडद लाल रंगाचे असतात. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळत आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 350 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.

error: Content is protected !!