Top 10 Rotavator : हे आहेत देशातील टॉप 10 रोटावेटर; वाचा… त्यांची गुणवैशिष्ट्ये?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना लवकरच शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे (Top 10 Rotavator) करावी लागणार आहे. यासाठी शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसाठी एखादा अत्याधुनिक रोटाव्हेटर खरेदी करण्याचा विचार करत असतील. तर तुम्हाला रोटाव्हेटर खरेदी करायचे असेल तर यावर अनुदानाचा लाभही सरकारकडून दिला जातो. आज आपण भारतात उपलब्ध टॉप 10 रोटाव्हेटरविषयी (Top 10 Rotavator) माहिती जाणुन घेणार आहोत. रोटाव्हेटर शेत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कृषी यंत्र ट्रॅक्टरला जोडून चालवले जाते.

देशातील टॉप 10 रोटावेटर (Top 10 Rotavator For Farmers)

मॅसिओ गॅस्पर्डो रोटावेटर : मॅसिओ गॅस्पर्डो कंपनीचे सुमारे 48 प्रकारचे रोटाव्हेटर्स (Top 10 Rotavator) प्रचलित आहेत. या कंपनीकडे Virat Pro, Virat J 175, Virat Pro HC 185, Virat Pro 125, Virat Regular 185, Virat Plus 145 इत्यादी मॉडेल्स आहेत.

शक्तिमान रोटावेटर : शक्तीमान कंपनीचे 18 प्रकारचे रोटाव्हेटर्स प्रचलित आहेत. रेग्युलर लाइट, चॅम्पियन सीरीज, यू-सिरीज, सेमी चॅम्पियन प्लस, रेग्युलर सीझन एसआरटी इत्यादी मॉडेल्स आहेत.

सोनालिका रोटावेटर : सोनालिका रोटावेटरचे 7 मॉडेल्स प्रचलित आहेत. यामध्ये मिनी स्मार्ट सिरीज चेन ड्राइव्ह, चॅलेंजर सिरीज, मिनी स्मार्ट सिरीज गियर ड्राइव्ह, स्मार्ट सिरीज, हॉर्नगल स्पीड सिरीज इत्यादी मॉडेल्स आहेत.

महिंद्रा रोटावेटर : महिंद्रा रोटावेटरची 17 मॉडेल्स प्रचलित आहेत. Gyrovator ZLX Plus, Gyrovator RLX, Gyrovator ZLX, Gyrovator SLX 175 इत्यादी मॉडेल्स आहेत.

फिल्डकिंग रोटावेटर : फील्डकिंगचे एकूण 12 मॉडेल प्रचलित आहेत. गोल्ड रोटरी टिलर, रेग्युलर मल्टी स्पीड, सिंगल मल्टी स्पीड, रुबस्ट सिंगल स्पीड इत्यादी मॉडेल्स आहेत.

सॉईल मास्तरचे रोटावेटर : सॉइल मास्टरचे 8 मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये JSMRT-C6 (6 फूट), JSMRT C7 (7 फूट), JSMRT L7 (7 फूट), JSMRT C5 (5 फूट) मॉडेल्सचा समावेश आहे.

खेडुत रोटावेटर : हेवी ड्युटी रोटरी टिलर, रोटरी टिलर रेग्युलर गायरोव्हेटर, मिनी रोटरी टिलर, रोटरी टिलर KAE RD मॉडेल्स अशी खेडूतची 4 मॉडेल्स चलनात आहेत.

करतार रोटावेटर : करतारचे 5 मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये जंबो 636-48, जंबो 536–42, रोटाव्हेटर
736-54, केआर 763-48, केआर 636-42 मॉडेल्सचा समावेश आहे.

दशमेश रोटावेटर : दशमेशचे दोन मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये 642 रोटाव्हेटर/रोटरी टिलर, 642 (7 फूट) मॉडेल्सचा समावेश आहे.

लँडफोर्स रोटावेटर : लँडफोर्सचे 4 मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये Robusto, Mini Series, Supremo, Vivo या मॉडेल्सचा समावेश आहे.

error: Content is protected !!