Top 5 Tractor : ‘हे’ आहेत टॉप 5 ट्रॅक्टर; ज्यांची आहे शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये मशागतीचा हंगाम (Top 5 Tractor) सुरु झाला आहे. ज्यामुळे सध्या अनेक शेतकरी बैलांच्या किमती वाढल्याने, मोठ्या ट्रॅक्टरसह छोटे ट्रॅक्टर खरेदी करण्यासही प्राधान्य देत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेतकऱ्यांसाठीच्या टॉप पाच ट्रॅक्टरबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे पुढे टॉप 5 ट्रॅक्टरची यादी, त्यांची वैशिष्ट्ये, डिटेल्स माहिती आणि किंमत जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हालाही तुमच्या गरजेनुसार आणि आर्थिक बजेटनुसार ट्रॅक्टरची (Top 5 Tractor) निवड करण्यास मदत होईल.

हे आहेत टॉप 5 ट्रॅक्टर (Top 5 Tractor In India)

फार्मट्रेक 60 क्लासिक ईपीआय टी20 : महिंद्रा ही भारतातील आघाडीची कंपनी आहे. परंतु यामध्ये फार्मट्रेक सुद्धा भारतीय कंपनी एस्कॉर्टच्या पुढे असलेली एक शक्तिशाली ट्रॅक्टर कंपन्यांमधील एक कंपनी (Top 5 Tractor) आहे. फार्मट्रेक 60 क्लासिक ईपीआय टी 20 हा 50 एचपी हॉर्स पावर क्षमता असलेला ट्रॅक्टर असून, त्याला 60 लिटरची डिझेल टाकी देण्यात आली आहे. तीन सिलेंडर असलेला हा शक्तिशाली इंजन असलेला ट्रॅक्टर आहे. या वैशिष्ट्यांमुळे हा ट्रॅक्टर 50 एचपी ट्रॅक्टर पैकी सर्वात चांगला ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची किंमत सात लाख ते सात लाख 25 हजार रुपये इतकी आहे.

सोनालिका 745 डीआय सिकंदर : सोनालिका भारतातील शेतकऱ्यांसाठी सर्वात विश्वासू ब्रँड आहे. कंपनी आपल्या कुशल ट्रॅक्टर निर्मितीसाठी ओळखली जाते. सोनालिका 745 डीआय सिकंदर हा ट्रॅक्टर 50 एचपी हॉर्स पावर क्षमता असलेला ट्रॅक्टर असून, तो शेतकऱ्यांना आरामदायक, शक्तिशाली इंजिन तसेच हायड्रॉलिक्ससह उपलब्ध आहे. या ट्रॅक्‍टरची किंमत पाच लाख 70 हजार ते सहा लाख तीस हजार रुपयांपर्यंत आहे.

न्यू हॉलंड 3630 TX प्लस : जेव्हापासून हा ट्रॅक्टर लॉन्च झाला तेव्हापासून शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये एक विशेष स्थान प्राप्त केले आहे. हा ट्रॅक्टर तीन सिलेंडर इंजिन सोबत येतो. तसेच 55 एचपीची शक्ती असलेला हा ट्रॅक्टर आहे. 1700 ते 2000 किलोपर्यंत वैकल्पिक हायड्रोलिक क्षमता त्याला देण्यात आली आहे. तसेच स्वतंत्र क्लचसोबत डबल क्लच सारख्या वेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्ये देखील त्यामध्ये आहेत. या ट्रॅक्टरची किंमत सात लाख दहा हजार ते सात लाख 60 हजार रुपयांपर्यंत आहे.

पावरट्रक युरो 50 नेक्स्ट : पावरट्रक हा एक अजून महत्त्वपूर्ण ट्रॅक्टर ब्रँड (Top 5 Tractor) असून, भारतीय शेतकऱ्यांसाठी तो खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. जेव्हा या ट्रॅक्टरच्या युरो सिरीजबद्दल बोलले जात होते. तेव्हा पावरट्रेक युरो 50 नेक्स्ट शेतकऱ्यांसाठी अधिक पसंतीचा आणि विश्‍वासू ट्रॅक्टर म्हणून समोर आला. हा ट्रॅक्टर 52 एचपीचा असून, त्यास तीन सिलेंडर इंजिन आणि दोन हजार किलोची हायड्रोलिक क्षमता देण्यात आलेली आहे. या ट्रॅक्‍टरची किंमत सहा लाख 65 हजार ते सात लाख 35 हजार रुपयांपर्यंत आहे.

कुबोटा MU5501 : कुबोटा ही जपानची कंपनी असून, उन्नत सुविधा आणि उच्च तंत्रज्ञानयुक्‍त ट्रॅक्टरसाठी ती ओळखली जाते. कुबोटा MU5501 हा ट्रॅक्टर अतिशय शक्तिशाली आणि आधुनिक अशा ई- सीडीआयएस इंजिनसोबत येतो. त्याला 55 एचपी क्षमता असलेले इंजिन देण्यात आले आहे. या ट्रॅक्टरची किंमत आठ लाख 60 हजार रुपये आहे.

error: Content is protected !!