Toxic Free Farming : विषमुक्त शेती, विषमुक्त कृषी उत्पादने ही काळाची गरज – फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील पहिले वैज्ञानिक शेतकरीच होते. त्यांनी शेतीतून सोने (Toxic Free Farming) पिकवले. अन्नधान्याच्या उत्पादनातून देशाला समृद्धीकडे नेले. मात्र जेव्हापासून मोठ्या प्रमाणात रसायनांचा उपयोग शेतीमध्ये सुरू झाला. त्यातून काही काळ उत्पादकता वाढली असली तरी आज पुन्हा विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती उत्पादने (Toxic Free Farming) ही काळाची गरज बनली आहे. शेतीतील विज्ञान पुन्हा नव्याने मांडण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (Toxic Free Farming) कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव 2024 चे उद्घाटन सातारा येथे फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, खासदार उदयनराजे भोसले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.

पंजाब परिणाम भोगतोय (Toxic Free Farming Are The Need)

देशात पंजाब राज्य शेतीमध्ये प्रगत राज्य म्हणून पाहिले जाते. पण बेसुमार रसायनांच्या वापरामुळे त्या ठिकाणी शेतीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. क्षारपड जमीन निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा व खतांचा वापर आवश्यक तेवढाच झाला पाहिजे. कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन, विविध पिकांमध्ये आंतरपिकांचा समावेश, ऊस तोडणीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, विषमुक्त शेती आणि कृषी उत्पादने या सर्व बाबी शिकण्यासाठी कृष्णा, कृषी व औद्योगिक महोत्सवासारख्या प्रदर्शनांची आवश्यकता आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.

सिंचनाचे प्रश्न मार्गी

कृषी आणि शेतकरी या दोहोंच्या प्रगतीसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. एक रुपयात पीक विमा योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, मागेल त्याला शेततळे, शेततळे अस्तरीकरण, मागेल त्याला ठिबक सिंचन अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले सिंचनाचे प्रकल्प सरकार मार्गी लावत आहेत. कृष्णा- कोयनेचे जलसिंचन प्रकल्पही मार्गी लावले आहे. सातारा जिल्ह्याचा दुष्काळी भाग म्हणून वर्षानुवर्षे ओळखल्या जाणाऱ्या भागात, यापुढे कोणत्याही प्रकारचा दुष्काळ नावालाही शिल्लक राहणार नाही. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

error: Content is protected !!