Toxic Free Farming: मराठवाड्याच्या पाचशे एकर क्षेत्रावर राबविला जाणार विषमुक्त शेतीचा प्रकल्प!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाड्यात 500 एकर क्षेत्रावर विषमुक्त जैविक शेतीचा (Toxic Free Farming) प्रकल्प राबविला जाणार आहे.   

शेतीमध्ये रासायनिक खताचा (Chemical Fertilizer) वापर वाढत असल्याने जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन प्रकल्प योजनेंतर्गत पैठण तालुक्यातील 10 गाव शिवारातील 500 एकर क्षेत्रावर विषमुक्त शेतीचा (Toxic Free Farming) प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट यांनी दिली.

शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर वाढल्याने जमिनीचा पोत (Soil Texture) बिघडत चालला आहे. तसेच कीटकनाशकांच्या फवारणीमुळे (Pesticide Spraying) मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. जमिनीचा सजीवपणा प्रामुख्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर अवलंबून असतो. जमिनीतील सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) हा जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचा घटक असून, जमिनीमध्ये असलेल्या जिवाणूसाठी व जीवजंतूंसाठी महत्त्वाचे माध्यम आहे.

विषमुक्त अन्न, प्रदूषण विरहित जमीन व पाणी आणि एकूणच शाश्वत कृषी उत्पादनासाठी नैसर्गिक सेंद्रिय शेती (Toxic Free Farming) हा पर्याय पुढे आला. याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने 2018 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना केली. त्यानंतर 2022 – 2023 ते 2017 – 2028 या कालावधीत राज्यभर हे मिशन राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली.

या अनुषंगाने पैठण तालुक्यात 10 गट तयार केले असून, एका गावात 50 हेक्टर जमिनीवर असे एकूण 500 हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेती (Toxic Free Farming) मिशन राबविण्यात येणार आहे. 

नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी (Natural & Organic Farming) निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे रसायनमुक्त सुरक्षित सकस नैसर्गिक शेतमाल उत्पादित करण्याचे उद्दिष्ट आहे.

कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रांकडे मार्गदर्शनाची जबाबदारी

नैसर्गिक शेतीस (Toxic Free Farming) प्रोत्साहन देण्यासाठी व शेतकर्‍यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्याचे काम कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र यांच्या समन्वयातून केले जाणार आहे. तसेच शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावर जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करून स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध केली जाणार आहे.

error: Content is protected !!