Tractor Industry : शेतीसह ट्रॅक्टर उद्योगालाही एल निनोचा फटका; यंदा विक्रीत 8 टक्के घट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी झालेल्या एल निनोमुळे (Tractor Industry) कमी पाऊस झाल्याने, देशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. तर ज्या काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात फळबागा जगवल्या. त्यांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. ज्यामुळे गेल्या वर्षी शेतीचे अर्थकारण पूर्णतः कोलमडले होते. शेतीतील चलन थांबल्याने त्याच्या थेट परिणाम देशातील ट्रॅक्टर विक्रीवर (Tractor Industry) देखील दिसून आला आहे. गेल्या वर्षी 2023-24 मध्ये देशातील सर्व ट्रॅक्टरच्या विक्रीत 8 टक्के तर निर्यात विक्रीत 22 टक्के घसरण नोंदवली गेली आहे.

वर्षभरात 8,67,597 ट्रॅक्टरची विक्री (Tractor Industry 8 Percent Decrease In Sales)

ट्रॅक्टर उद्योगातील आर्थिक वर्ष 2023-24 मधील आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये देशातील सर्व ट्रॅक्टर कंपन्यांना एकूण 8,67,597 ट्रॅक्टरची विक्री (Tractor Industry) करण्यात यश मिळाले आहे. मागील वर्षी 22-2023 या आर्थिक वर्षांमध्ये सर्व ट्रॅक्टर कंपन्यांनी एकूण 9,45,311 ट्रॅक्टरची विक्री केली होती. अर्थात यंदा एल निनोच्या प्रभावामुळे देशातील एकूण ट्रॅक्टर विक्रीत 8 टक्के घसरण नोंदवली गेली आहे.

चौथ्या तिमाहीतही विक्रीत घट

दरम्यान, ट्रॅक्टर उद्योगातील आकडेवारीनुसार, 2023-24 या चालू आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत देशातंर्गत 1,62,621 ट्रॅक्टरची विक्री करण्यात आली. जी मागील वर्षी याच कालावधीत 2,10,858 ट्रॅक्टर इतकी नोंदवली गेली होती. अर्थात चौथ्या तिमाहीत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने, ट्रॅक्टर विक्रीत वाढ होते. मात्र, यंदा चौथ्या तिमाहीत ट्रॅक्टर विक्रीत घट दिसून आली आहे.

का घटली ट्रॅक्टर विक्री?

ट्रॅक्टर उद्योगातील जाणकारांच्या माहितीनुसार, यंदा एल-निनोचा अप्रत्यक्ष प्रभाव ट्रॅक्टर विक्रीवर दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांना खरिपातून जास्त काही आर्थिक उत्पन्न हाती उरले नाही. तर रब्बी हंगामात सातत्याने झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. त्याचा थेट परिणाम ट्रॅक्टर उद्योगावर देखील झाला असून, यंदाच्या आर्थिक वर्षात सर्वच ट्रॅक्टर कंपन्यांची विक्री मोठ्या संख्येने घटली आहे. यात प्रामुख्याने देशातील एकूण ट्रक्टर विक्रीत दक्षिणेकडील राज्यामध्ये 20 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली आहे.

error: Content is protected !!