हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीच्या अनेक छोट्या-मोठया कामांसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची (Tractor Insurance) आवश्यकता असते. पेरणीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत इतकेच काय तर शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी देखील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची गरज पडते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपला ट्रॅक्टर सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे असते. एखाद्या ठिकाणी अपघातात नुकसानीचा सामना करावा लागू नये. म्हणून ट्रॅक्टरचा इन्शुरन्स करून घेणे खूप गरजेचे असते. भारतीय वाहन कायद्याअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टरचा इन्शुरन्स (Tractor Insurance) करणे खूप आवश्यक असते. अन्यथा एखाद्या परिस्थितीत तुमच्यावर दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरचा इन्शुरन्स (Tractor Insurance) करून घेतल्यास त्यांना अनेक फायदे मिळतात. जसे की एखाद्या अपघातात तुमच्या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असेल तर तुम्हाला खराब झालेला ट्रॅक्टर पुन्हा व्यवस्थितीत करण्यासाठी संपूर्ण खर्च मिळू शकतो. त्यामुळे ही बातमी शेवटपर्यंत संपूर्ण वाचा. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज आपण ट्रॅक्टर इन्शुरन्सबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
थर्ड पार्टी ट्रॅक्टर इन्शुरन्स (Tractor Insurance For Farmers)
इन्शुरन्सच्या या प्रकारामध्ये ट्रॅक्टर मालकाची कायदेशीररित्या सर्व देणेदारी दिली जाते. यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देखील मिळते. याशिवाय एखाद्या दुर्घटनेत तुमच्या ट्रॅक्टरमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा तो जखमी झाला. हे देखील ट्रॅक्टर इंशुरन्सच्या कक्षेमध्ये येऊन, तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागत नाही. इतकेच नाही तर थर्ड पार्टी इंशुरन्समध्ये ट्रॅक्टर मालक आणि ड्रायव्हर या दोघांनाही अपघाती परिस्थितीत सर्व वैद्यकीय खर्च मिळतो.
सर्वसमावेशक ट्रॅक्टर इन्शुरन्स
सर्वसमावेशक प्रकारच्या इन्शुरन्समध्ये तुमच्या ट्रॅक्टरला पूर्णपणे सुरक्षित करण्यात आले आहे. या प्रकारच्या इन्शुरन्समुळे एखाद्या अपघातात, नैसर्गिक संकटात किंवा मग आग, चोरीच्या घटनेत तुमच्या ट्रॅक्टरचे काही नुकसान झाल्यास तुम्हाला कंपनीकडून संपूर्ण नुकसान भरपाई मिळते. याशिवाय तुमच्या ट्रॅक्टर ड्रॉयव्हरचे देखील काही नुकसान झाल्यास ते या प्रकारामध्ये ग्राह्य धरण्यात आले आहे. या इन्शुरन्स प्रकारात सर्व नुकसान, वैयक्तिक अपघात भरपाई आणि थर्ड पार्टी इशरन्सचा समावेश असतो.
ट्रॅक्टरचा इन्शुरन्स का करावा?
आता महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया… तुम्हाला कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच पडला असेल की ट्रॅक्टर इन्शुरन्स (Tractor Insurance) नेमका का करावा? तर भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार, प्रत्येक नवीन ट्रॅक्टर घेतल्यानंतर त्यास इन्शुरन्स अनिवार्य करण्यात आला आहे. असे न केल्यास या कायद्याद्वारे तुमच्यावर करावी देखील होऊ शकते. इतकेच नाही तर ट्रॅक्टरसंबंधी कोणतेही नुकसान टाळण्यासाठी इन्शुरन्स हा खूप महत्वाचा असतो. तुम्ही जर ट्रॅक्टरचा इन्शुरन्स काढला असेल तर तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरची प्रत्येक नुकसानीची भरपाई मिळण्यास पात्र असतात. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या ट्रॅक्टरचे झालेले नुकसान कंपनीकडून दिले जाते.
ट्रॅक्टरचा इन्शुरन्सचे फायदे?
- तुमच्या ट्रॅक्टरचे कोणत्याही प्रकारचे झालेले नुकसान, ट्रॅक्टर इन्शुरन्समुळे भरून मिळते.
- ट्रॅक्टर चोरीला गेला तरी तुम्हाला ट्रॅक्टरची नुकसान भरपाई मिळते.
- शेतीमध्ये काम करताना अचानक निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या ट्रॅक्टरचे नुकसान झाल्यास तुम्हाला आर्थिक मदत मिळते.
- तसेच अपघातात तुमच्या ट्रॅक्टरमुळे दुसऱ्यांचे नुकसान झाल्यास, ते देखील नुकसान भरपाईमध्ये ग्राह्य धरले जाते.
- याशिवाय तुमच्या ट्रॅक्टरवरील ड्रायव्हरला अपघातात मोठी इजा झाली असेल तर तो खर्च देखील इंशुरन्समधून मिळतो.
- एखाद्या गटाने किंवा लोकांनी दंगा किंवा अन्य वेळी तुमच्या ट्रॅक्टरवर दगडफेक केली असेल. त्यात तुमच्या ट्रॅक्टरचे नुकसान झाल्यास तेव्हा देखील नुकसान भरपाई मिळते.
- जर तुमच्या ट्रॅक्टरचे काही कारणास्तव आगीमुळे नुकसान झाल्यास तेव्हा देखील नुकसान भरपाई मिळते.
- शेतकरी अशा सर्व परिस्थितीत कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवू शकतात.
कसा कराल ट्रॅक्टरचा इन्शुरन्स?
ट्रॅक्टरचा इन्शुरन्स (Tractor Insurance) करणे खूपच सोपे असून, त्यासाठीची प्रक्रिया देखील खूपच सुटसुटीत आहे. तुम्हालाही आपल्या ट्रॅक्टरचा इन्शुरन्स करायचा असेल तर तुम्ही एचडीएफसी किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ट्रॅक्टर इन्शुरन्स सारख्या विविध ट्रॅक्टर इन्शुरन्स कंपन्यांकडून ट्रॅक्टर विमा पॉलिसी मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला तुमचा इन्शुरन्स प्रकार आणि कागदपत्रांची आवश्यकता असते. यासाठी जवळच्या संबंधित बँक शाखांना भेट द्या.