Tractor loan : शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक वेगेवेगळ्या योजना राबवत असते. या योजनांचा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अशाच योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी भारत सरकारच्या बँकांकडून कर्ज दिले जाते. या योजनेनुसार, SBI बॅंक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत कर्ज देते. महत्वाचं म्हणजे या कर्जावरील व्याजही खूप कमी आहे.
ट्रॅक्टरसाठी कोण कर्ज घेऊ शकतो?
जे भारताचे रहिवासी आहेत आणि सरासरी वार्षिक उत्पन्न दहा लाख आहे. यासोबतच शेतकऱ्याकडे दोन किंवा अधिक एकर लागवडीयोग्य जमीन आहे अशा शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे. या कर्जासाठी तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे देखील लागणार आहोत. जाणून घेऊया त्या कागदपत्रांबद्दल माहिती. (Tractor loan)
अनुदान मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा हे अँप
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सरकारी योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमचे Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला सरकारी योजनांबद्दल माहिती मिळेलच पण त्याचबरोबर बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री इत्यादींची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्यामुळे लगेचच हे अँप इंस्टाल करा
कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जमिनीशी संबंधित कागदपत्रे
- रहिवासी प्रमाणपत्र
- 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मोबाईल नंबर
- दोन पासपोर्ट इत्यादी कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत.
ट्रॅक्टरचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. त्यानंतर बँकेतुन ट्रॅक्टर कर्जासाठी संबंधित फॉर्म घेऊन भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, पॅन क्रमांक ही सर्व माहिती एकदम अचूक पद्धतीने भरावी लागेल. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म बँकेत जमा करावा लागेल. नंतर हा फॉर्म तपासून पुढील कर्जाची प्रक्रिया चालू होईल. (Latest Marathi News )