Tractor Loan : असे मिळवा ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज; लागतात ही कागदपत्रे, पहा व्याजदर किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ट्रॅक्टर (Tractor Loan) हा शेतकऱ्यांसाठी सध्याच्या घडीला सर्वात महत्वाचे साधन बनला आहे. ‘ट्रॅक्टरशिवाय शेती करणे’ आज या गोष्टीची आपण कल्पना देखील करू शकत नाही. ट्रॅक्टरमुळे शेतीची सर्वच कामे अगदी सहजपणे होत असल्याने शेतीमध्ये ट्रॅक्टरला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करायचा असतो. मात्र, भांडवल नसल्याने त्यांना तो खरेदी करता येत नाही. मात्र, शेतकऱ्यांना चिंता गरज नसून, तुम्हाला देखील ट्रॅक्टर खरेदी करायचा असल्यास, अशा अनेक बँका आहेत. ज्या शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज (Tractor Loan) उपलब्ध करून देतात.

नामांकित बँका देतात कर्ज (Tractor Loan Documents Interest Rate)

विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 15 लाखांपर्यंत वैयत्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या ट्रॅक्टर खरेदी कर्ज (Tractor Loan) योजनेबाबत विस्तृतपणे लवकरच वृत्त दिले जाईल. मात्र, राज्य सरकारच्या या कर्ज योजनेव्यतिरिक्त तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक अशा नामांकित बॅंकांकडून देखील ट्रॅक्टर खरेदीसाठी अल्प व्याजदरात कशा पद्धतीने कर्ज मिळवू शकतात? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कुठे करायचा? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

किती असतो व्याजदर?

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील आघाडीची बँक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज (Tractor Loan) उपलब्ध करून देते. यासाठी शेतकऱ्यांकडे आपली स्वतःची कमीत कमी 2 एकर जमीन असावी लागते. ट्रॅक्टर खरेदीसाठीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्जाचा व्याजदर हा कमीत कमी 9 टक्के इतका आहे. शेतकऱ्यांना बँकेकडून ट्रॅक्टरच्या एकूण रकमेपैकी 80 टक्के रक्कम दिली जाते. तर 20 टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतःला उभी करावी लागते. याशिवाय एचडीएफसी बँक ही देखील देशातील एक नामांकित बँक असून, जी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी एकूण रकमेच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. या बँकेचा देखील ट्रॅक्टर खरेदी कर्जाचा व्याजदर हा कमीत कमी 9 टक्के इतका आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्याचे वय हे 18 वर्ष पूर्ण किंवा त्याहून अधिक असावे लागते.

कुठे मिळवाल कर्ज?

 • ट्रॅक्टर खरेदीसाठीचे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा एचडीएफसी बँक या बँकांच्या शाखेला भेट द्यावी लागेल.
 • त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅक्टर खरेदी कर्ज मिळवण्यासाठी सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून समजावून घ्या. त्यानंतर त्यांच्याकडून कर्जासाठी अर्ज घेऊन तो भरा.
 • या अर्जामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, पॅन कार्ड नंबर अशी सर्व माहिती भरावी लागेल.
 • हा संपूर्ण अर्ज भरून बँकेत जमा करा. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
 • बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करून, तुम्हाला कर्ज मंजूर करण्याची संपूर्ण प्रकिया पूर्ण करेल.

आवश्यक कागदपत्रे?

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • निवडणूक ओळखपत्र
 • वाहन परवाना (असेल तर)
 • वीज बिल
 • बँक स्टेटमेंट
 • जमिनीचा 7/12 उतारा

(टीप : सध्या ऑनलाईन पद्धतीने बनावट वेबसाईटच्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदान योजना किंवा कर्ज योजना राबवली जाते. असे प्रलोभन दाखवून शेतकऱ्यांच्या फसवणूक होण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा फसवेगिरीला बळी पडू नये)

error: Content is protected !!