Tractor Maintenance : ट्रॅक्टरची निगा कशी ठेवावी; ज्याद्वारे मिळेल दहा ते पंधरा वर्षापर्यंत कार्यक्षमता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीच्या कामासाठी आजकाल ट्रॅक्‍टरचा वापर (Tractor Maintenance) खूपच वाढला आहे. ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने शेताची नांगरणी, रोटावेटर, जमीन सपाटीकरण तसेच पेरणी सारखे बरीचशी कामे सुलभरीत्या, दर्जेदारपणे व कमी वेळेत होऊ शकतात. शेती व्यवसायाच्या भरभराटीत ट्रॅक्टरचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेला ट्रॅक्टर सुलभतेने चालावा व त्याची कार्यक्षमता कमीत कमी दहा ते पंधरा वर्षे टिकून राहायला हवी. यासाठी ट्रॅक्टरची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते. याच पार्श्वभूमीवर आज आपण ट्रॅक्टरची निगा (Tractor Maintenance) कशी ठेवावी? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

अशा पद्धतीने घ्या ट्रॅक्टरची काळजी (Tractor Maintenance)

ट्रॅक्टर चे काम झाल्यानंतर ऊन आणि पाऊस यांपासून सुरक्षित अशा जागी निवार्‍याला उभा करावा. काम झाल्यानंतर धूळ, चिखल तसेच काडी-कचरा काढून व्यवस्थित स्वच्छ करावा. ट्रॅक्टर हा नेहमी एक हाती असावा. ड्रायव्हरसारखे बदलू नयेत तसेच महत्त्वाचे म्हणजे ट्रॅक्टर चालू करण्यापूर्वी काही गोष्टी काळजीपूर्वक करायला हव्यात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे इंजिन टाकीतले तेल पुरेसे आहे की नाही ते पाहावे.

‘या’ गोष्टी नियमित चेक कराव्यात?

पंपामधील वंगण/तेल डीप स्टिकच्या सहाय्याने तपासावे. रेडिएटरमधील पाणी कमी झाले असेल तर ते भरावे. एअर क्लीनर स्वच्छ करावा. ट्रान्समिशन ऑइल डीपस्टिकच्या साह्याने (Tractor Maintenance) तपासावे. टायर मधला हवेचा दाब योग्य आहे की नाही याची खात्री करावी. ज्या ठिकाणी ग्रीसची आवश्यकता असते, असे भाग तपासावेत. महत्वाचे नॉट आणि बोल्ट तपासावे. तसेच बॅटरी मधल्या पाण्याची पातळी योग्य आहे की नाही हे तपासावे.

क्लच नेहमी हळुवार सोडावा

ट्रॅक्टर बंद करताना थ्रोटल लिव्हर ओढावी आणि इंजिनची गती कमी करावे. क्लच पॅडल दाबावे. गिअर शिफ्ट लिव्हर न्यूट्रल पोझिशनला ठेवावी. मेन स्वीच ऑफच्या बाजूला फिरवावे. गरज असेल तरच पार्किंग ब्रेक लावावेत. ट्रॅक्टरचा इंजिनमधून सतत काळा धूर निघत असेल तर त्या वरचा भार कमी करावा. ट्रॅक्टर गतीमध्ये असताना त्वरित गियर बदलू नये. ट्रॅक्टर मागे घेताना अवजारे जोडताना आपण दक्षता घ्यावी. ड्राबर पट्टी अगर अवजारांवर उभे राहू नये. क्लच नेहमी हळुवार सोडावा. रोडवर चालताना दोन्ही चाकांना ब्रेक लागतो का नाही ते तपासावे. उतारावरून जाताना नेहमी ट्रॅक्टर गिअर मध्ये असावा. पुली गतीत असताना बेल्ट लावू अगर काढू नये. मॅन्युअल प्रमाणे ट्रॅक्टरचा सर्विसिंग करून घ्याव्यात.

कामाच्या तासावरून ट्रॅक्टरचे व्यवस्थापन

  • आठ ते दहा तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी-
  • इंजिन मधील व इयर क्लीनर मधील तेलाची पातळी तपासावे.
  • रेडिएटर व बॅटरी मधील पाण्याची पातळी तपासावे.
  • ट्रॅक्टर चे काम धुळीमध्ये असेल तर इयर क्लीनर मधील तेल बदलावे.
  • डिझेल लिकेज आहे का ते पहावे.
  • पन्नास ते साठ तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी-
  • फॅन बेल्ट तान योग्य प्रमाणात असल्याची खात्री करावी.
  • गिअर बॉक्स मधील तेलाची पातळी तपासावी.
  • ट्रॅक्टरच्या चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी.
  • बॅटरी व मोटार यांचे सर्व कनेक्शन घट्ट बसवावी.
  • इंधन फिल्टर मध्ये साचलेले पाणी बाहेर काढावे.
error: Content is protected !!