Tractor Rotavator : ‘हे’ देशातील पाच टॉप रोटावेटर; शेतीसाठी ठरतायेत वरदान, वाचा..वैशिष्ट्ये?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एक काळ असा होता की शेतकरी संपूर्ण कुटुंबाला शेतीमध्ये गुंतवून (Tractor Rotavator) ठेवत असत. परंतु आजच्या काळात कृषी यंत्रांनी शेतीची कामे अगदी सोपे झाले आहेत. शेतीमध्ये उपयोग येणारे वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे आहेत. त्यापैकी रोटावेटर एक खूप महत्त्वाचे कृषी यंत्र आहे. रोटावेटरमुळे शेतकऱ्यांसाठी शेती करणे तर सोपे झालीच, परंतु त्याच्या मदतीने शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन देखील घेऊ शकतात. आज आपण शेतकऱ्यांना उपयुक्त अशा पाच भारतातील रोटावेटरची (Tractor Rotavator) माहिती घेऊ. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

हे आहेत पाच टॉप रोटावेटर (Tractor Rotavator For Farmers)

महिंद्रा गायरोटावेटर झेडएलएक्स 145 : महिंद्रा हे कृषी यंत्र यांच्या निर्मितीत पुढे असून महिंद्रा गाय रोटावेटर ZLX 145 ची भारतातील किंमत 89000 पासून सुरू होते. महिंद्रा चा हा रोटावेटर (Tractor Rotavator) मल्टी स्पीड ड्राईव्हने सुसज्ज आहे. तसेच यामध्ये अनेक वैशिष्ट्य असून ज्यामध्ये मल्टी डेप्थ ॲडजस्टमेंट,डियो कोण मेकॅनिकल वॉटर टाईट सील समाविष्ट आहे.

मॅसिओ गॅस्पर्डो रोटावेटर : भारतीय बाजारपेठेमध्ये या कंपनीचे सुमारे चाळीस प्रकारचे रोटावेटर प्रसिद्ध आहेत. यामध्ये विराट प्रो, विराट प्रो एचसी 185, विराट जे 175, विराट प्रो 125, विराट प्लस 145, विराट रेगुलर 185 इत्यादी मॉडेलचा समावेश आहे.

शक्तिमान रोटावेटर : शक्तिमान उद्यान रोटावेटर हे भारतीय शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरलेली कृषी यंत्र आहे.हे विशेषतः ओलसर जमिनीसाठी आणि हलकी आणि मध्य माती प्रकारासाठी वापरली जाते. भारतात 48 ब्लेड असलेल्या शक्तिमान रेगुलर लाईट रोटावेटर ची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. याशिवाय शक्तिमान कंपनीचे अनेक प्रकारचे रोटावेटर भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध आहेत. यामध्ये रेग्युलर लाईट, चॅम्पियन सिरीज, यु सिरीज, सेमी चंपियन प्लस, रेगुलर सीजन एसआरटी इत्यादी मॉडेल्सचा समावेश आहे.

सोनालिका मल्टीस्पीड सिरीज : सोनालिका रोटावेटर चे सात मॉडेल भारतात प्रसिद्ध आहेत. मिनी स्मार्ट सीरीज चेन ड्राईव्ह, चॅलेंजर सिरीज, मिनी स्मार्ट सिरीज गिअर ड्राईव्ह, स्मार्ट सिरीज, हॉर्नर स्पीड सिरीज इत्यादी मॉडेल्स प्रसिद्ध आहेत. सोनालिका हा भारतातील शेतकऱ्यांमधील विश्वास असलेला ब्रँड असून शेतीची उत्पादकता वाढविण्यास मदत करणाऱ्या सर्वोत्कृष्ट ब्रँडमध्ये त्याची गणना केली जाते. सोनालिका मल्टी स्पीड सिरीजची भारतातील किंमत एक लाख अकरा हजार पासून सुरू होते.

सोईल मास्टर जेएसएमआरटी सी 8 : हे रोटावेटर मऊ आणि कडक अशा दोन्ही मातीसाठी कामात यावे यासाठी खास प्रकार डिझाईन केलेले आहे. सोईल मास्टर JSMRT C8 ची किंमत शहाण्णव हजार रुपये आहे.

error: Content is protected !!