Tractor Subsidy : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळतेय सवलत; काय आहे योजना?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आनंदाची बातमी आहे. ट्रॅक्टर (Tractor) हा शेतीसाठी अतिशय उपयुक्त आणि गरजेचा मानला जातो. परंतु सर्वानाच ट्रॅक्टर खरेदी करणं आर्थिकदृष्टया परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी इच्छा असूनही आणि शेतीसाठी गरजेचा असूनही ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी योजना (Tractor Subsidy) सुरू करण्यात आलेली असून, येत्या दसऱ्यापासून त्याची सुरुवात होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

एस्कॉट टर्बो आणि महिंद्रासोबत करार- (Tractor Subsidy)

नरेंद्र पाटील म्हणाले की, महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परता योजनेअंतर्गत स्थगित असलेली ट्रॅक्टर खरेदी पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही केलेली आहे. येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीच्या माध्यमातून (Tractor Subsidy) सुरु होणार आहे. यासाठी एस्कॉट टर्बो आणि महिंद्रा या २ मोठ्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार ते दोन लाख रुपये मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना आणि आवश्यक शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना असा योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही शेतीशी संबंधित अवजारे आणि भाडेतत्वावर सेवा हव्या असतील तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. यामाध्यमातून तुम्हाला शेतीशी निगडित कोणतेही काम करायचं असेल तर सदर ट्रॅक्टरवाला, जेसीबीवाला, तसेच अन्य अवजारे भाडेतत्वावर मिळतील. यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. याशिवाय हॅलो कृषी मध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, रोजचा बाजारभाव, पशु खरेदी विक्री आदी सोयी अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि सर्वफ सुविधांचा लाभ घ्या

या व्यतिरिक्त वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून अंतर्गतकर्ज मर्यादा 10 लाख रुपये वरून 15 लाख रुपये करण्यात आलेली आहेत. 3 लाख रुपयांची व्याज परताव्याची रक्कम सुद्धा वाढवण्यात आली असून 4.5 लाख रुपये केली आहे. याशिवाय आधीची पाच वर्षाची मुदत आता सात वर्षे करण्यात आली आहे. महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वांकरिता वयोमर्यादा ही 60 वर्षेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!