Tractor Subsidy Scheme : ट्रॅक्टरसाठी 50 टक्के अनुदान, प्रलोभनाला बळी पडून नका; होईल फसवणूक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Tractor Subsidy Scheme) राबवल्या जात आहे. या योजनांचा शेतकऱ्यांना योग्य तो फायदा देखील होत आहे. मात्र काही समाज माध्यमांवर ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना’ या योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायरल होत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा पूर्णतः खोटा असून, अशी ट्रॅक्टर अनुदानाबाबत कोणतीही योजना (Tractor Subsidy Scheme) केंद्र सरकारकडून चालवली जात नसल्याचे केंद्र सरकारच्या अधिकृत ‘पीआयबी फॅक्ट चेक’ या एक्स समाजमाध्यमावर सरकारने म्हटले आहे.

50 टक्के सबसिडी? (Tractor Subsidy Scheme For Farmers)

पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 50 टक्के सबसिडी (Tractor Subsidy Scheme) देण्यात येत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीला ट्रॅक्टर उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. 50 टक्के अनुदान मिळत असल्याने अनेक जण या योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रयत्न करतात. सरकारी योजना समजून अर्ज करतात. मात्र तुम्हालाही सोशल मीडिया पोस्ट किंवा इतर काही माध्यमातून या संदर्भात माहिती मिळाली असेल आणि तुम्हीही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर, याबाबत सत्यता पडताळून घ्या. अन्यथा तुमची फसवणूक होऊन, तुम्हांला नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

‘ही’ सरकारची योजना आहे काय?

‘पीआयबी फॅक्ट चेक’ या एक्स समाजमाध्यमावर केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना’ ही सरकारी योजना नाही. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची वेबसाईट इंटरनेटवर आहे. परंतु, अशी वेबसाईट आणि योजना केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून राबवली किंवा चालवली जात नसल्याचे सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे. ही वेबसाईट आणि योजना पूर्णपणे बनावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.

‘या’ योजनेसाठी अर्ज करु नका

तुम्हीही समाजमाध्यमांवर फिरत असलेली ही माहिती वाचून, ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना’ या योजनेसाठी अर्ज करण्याच्या विचारात असाल. तर ही योजना बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. सरकारी योजनांची मदत घेऊन अनेक फसवणूक करणारे पीएम किसानच्या नावाने अनेक वेबसाइट्स चालवत आहेत. त्यामुळे अशा बनावट वेबसाइट्सपासून दूर राहा आणि चुकूनही पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी जारी केलेल्या बनावट वेबसाइटवर अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

बनावट योजनांपासून सावध राहा

केंद्र सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यात शेतकऱ्यांसाठीही सरकारने विविध योजना सुरु केलेल्या आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे तर देशभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळत आहे. मात्र अशात तुम्हाला सरकारच्या नावाखाली काही समाजकंटकाकडून बनावट योजनांद्वारे फसवले जाऊ शकते. सद्यस्थितीत इंटरनेटवर अशा अनेक बनावट योजनांच्या अनेक बनावट वेबसाइट कार्यरत आहेत. यातील काही वेबसाइट्सवर सरकारकडून बंदही घालण्यात आली आहे. मात्र तरीही अशा अनेक वेबसाईट्स पाहायला मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अधिकृत ‘पीआयबी फॅक्ट चेक’ या एक्स समाजमाध्यमावर संदेश जारी करत शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!