Tractor : शेतकऱ्यांनो आता इस्रायली टायरच्या मदतीने करा शेती, जमिनीचे सुधारेल आरोग्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tractor : भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. यावर्षी राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पेरण्या केल्या जात आहेत. काही शेतकरी ट्रॅकटरच्या किंवा बैलांच्या साहाय्याने मशागत करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मशागतीसाठी खूप खर्च होत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इस्राइल तंत्रज्ञानावर आधारित नवीन पद्धतीचे टायर आता बाजारात येणार आहेत. या टायरच्या वापराने मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल असा दावा कंपनीने केला आहे. नक्की हे तंत्रज्ञान काय आहे? ट्रॅक्टरच्या टायरमुळे जमिनीचे आरोग्य कसे सुधारणार हे आपण आज जाणून घेणार आहोत.

इस्रायली कंपनी Galileo CupWheel यांनी नुकतेच आपण एक विशेष तंत्रज्ञानावरील टायर निर्माण केला असल्याचे जाहीर केले आहे. हा टायर सर्वसामान्य टायरपेक्षा पूर्णपणे भिन्न असून यामुळे शेतजमिनीची मशागत करताना ट्रॅक्टरला हा टायर जोडल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं कंपनीच्या सीईओ यांनी सांगितले आहे. मात्र एका टायरमुळे जमिनीचे आरोग्य कसे सुधारणार याबाबत अनेकांना प्रश्न पडला असून कंपनीने याबाबत अधिक माहिती सांगण्यास नकार दिला आहे.

लवकरच बाजारात इस्रायली टायर येणार आहे. त्यामुळे आता इस्रायली टायरच्या मदतीने तुम्हाला शेती करणे सोयीस्कर होणार आहे. परंतु तुम्हाला यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण या वर्षाच्या शेवटी हा ट्रॅक्टरचा नवीन टायर येणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या ट्रॅक्‍टरमधील कॉम्पॅक्‍शन जोखीम कमी करता येईल.

इतकेच नाही तर तुमच्या जमिनीचे आरोग्य यामुळे सुधारू शकते. इस्रायलमध्ये विकसित झालेली गॅलिलिओ कपव्हील ही एक संकरित प्रणाली असून जी टायर्सची रोडेबिलिटी, कार्यक्षमता आणि सुसंगतता यांसारख्या जबरदस्त फायद्यांसह रबर ट्रॅकचे ट्रॅक्शन आणि फ्लोटेशन फायदे एकत्र करते.

याबाबत गॅलिलिओचे (Galileo CupWheel) उपाध्यक्ष समेह टॉड यांनी सांगितले आहे की, ‘ हे तंत्रज्ञान प्रामुख्याने इस्रायलमधील केंद्रीय पिव्होट इरिगेटर्सवर वापरण्यात येते. परंतु आता ते ट्रॅक्टर आणि बांधकाम वाहनांवर वापरण्यासाठी इतर बाजारपेठांमध्ये आणण्यात येत आहे. याच्या पायाचा ठसा ट्रॅकसारखा असून एका ट्रॅकमध्ये दोन ते तीन रोलर्स दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.

error: Content is protected !!