Tree Stores Water in Trunk: अरे वाह! हा वृक्ष साठवतो त्याच्या खोडात पाणी; जाणून घ्या माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: एखाद्या झाडावर कुऱ्हाड मारावी आणि त्यातून चक्क पाण्याचा फवारा (Tree Stores Water in Trunk) बाहेर पडावा! आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु ही गोष्ट घडली आहे आंध्रप्रदेश या राज्यात.

सध्या हा आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ सगळीकडे प्रसारित होत आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) वन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी इंडियन लॉरेल (Indian Laurel Tree) वृक्षाच्या खोडाचा काही भाग तोडल्यानंतर त्यात साठलेले पाणी बाहेर पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पाण्याचा दाब आणि खोडामध्ये साठलेले पाणी (Tree Stores Water in Trunk) पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडीओ बघा – खोडात पाणी साठवणारा ‘इंडियन लॉरेल’ वृक्ष  

इंडियन लॉरेल वृक्षाची वैशिष्ट्ये (Indian Laurel Tree Features)

भारतीय लॉरेल वृक्ष, याला शास्त्रीय भाषेत फिकस मायक्रोकार्पा म्हणून ओळखले जाते, हे एक उष्णकटिबंधीय किंवा उपोष्णकटिबंधीय वृक्ष आहे जे प्रामुख्याने आशिया, पश्चिम पॅसिफिक बेटे आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांमध्ये आढळते.

हे एक शोभेचे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते. या झाडाच्या फांद्यांचा घेर मोठा असल्यामुळे चांगले छत सुद्धा प्रदान करते.  या झाडाची साल गुळगुळीत हलकी-राखाडी असून त्याला  चमकदार हिरवी पाने आहेत. त्याची जाड पर्णसंभार विविध पक्ष्यांच्या प्रजातींसाठी उत्कृष्ट निवासस्थान तयार करते आणि त्याचे छोटे गोल अंजीरसारखी फळे अनेक पक्ष्यांसाठी अन्न आहे.

इंडियन लॉरेल (Tree Stores Water in Trunk) हा खोडात पाणी साठवणारा वृक्ष आंध्रप्रदेशातील गोदावरी परिसरातील पापीकोंडा राष्ट्रीय अभयारण्यात आढळून आल्याची माहिती आहे.

उन्हाळ्यात पाणी साठवण्यासाठी  हे झाड ओळखले जाते आणि 2020 मध्ये केरळचे (Kerala) मुख्य वन्यजीव वॉर्डनने (CWLW) याचा शोध लावला तेव्हा त्याची प्रथम नोंद झाली असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भारतीय लॉरेलच्या झाडाच्या सालातून बाहेर पडणारे पाणी अशा वेळी येते जेव्हा आंध्र प्रदेश आणि शेजारील कर्नाटकसह भारताच्या अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई (Water Scarcity) निर्माण झाली आहे, जिथे त्याची राजधानी बेंगळुरूला तीव्र जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. तेथे लॉरेल सारखा वृक्ष पाण्याचे महत्व जाणून घेऊन साठवण करत आहे असे दिसून येते.

माणसांपेक्षा निसर्ग जास्त जबाबदारीने वागतो हेच परत एकदा सिद्ध होत आहे.

error: Content is protected !!