Tur Bajar Bhav : तुरीचे दर 10 हजाराच्या खाली उतरले; वाचा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर दरात (Tur Bajar Bhav) आज मोठी घसरण झाली आहे. प्रति क्विंटल 10800 रुपयापर्यंत पोहचलेले तुरीचे आज जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये 10 हजार रुपयांच्या खाली घसरले आहेत. एकही बाजार समितीमध्ये आज तुरीला सरासरी 10 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळू शकलेला नाही. तर हिंगोली, देवणी(लातूर), उमरगा (धाराशिव) दुधणी (सोलापूर), चांदूर बझार (अमरावती) या काही मोजक्या बाजार समित्या वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये कमाल 10 हजार रुपये प्रति क्विंटलचा पल्ला तूर दराने गाठलेला नाही. परिणामी, अचानक तुरीचे दर (Tur Bajar Bhav) 10 हजारांच्या खाली घसरल्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

कमाल 10 हजार रुपये दर कुठे? (Tur Bajar Bhav In Maharashtra)

देवणी(लातूर) बाजार समितीत आज 8 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10200 ते किमान 9700 रुपये तर सरासरी 9950 रुपये प्रति क्विंटल दर (Tur Bajar Bhav) मिळाला आहे. दुधणी (सोलापूर) बाजार समितीत आज 577 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10125 ते किमान 8800 रुपये तर सरासरी 9500 रुपये, उमरगा (धाराशिव) बाजार समितीत आज 10 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 9850 रुपये तर सरासरी 9950 रुपये, हिंगोली बाजार समितीत आज 355 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10050 ते किमान 9300 रुपये तर सरासरी 9675 रुपये, चांदूर बझार (अमरावती) बाजार समितीत आज 560 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 8000 रुपये तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

दरम्यान, आज मुखेड (नांदेड) परतूर (जालना) दिग्रस (यवतमाळ) जिंतूर (परभणी), अमरावती या काही निवडक बाजार समित्यांमध्ये तुरीला सरासरी 9500 ते 9900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळू शकला आहे. यवतमाळ, चिखली, बाभुळगाव, मेहकर, काटोल, सोनपेठ या महत्वाच्या तुरीच्या बाहेर समित्यांमध्ये देखील तुरीचे दर हे 9500 रुपये प्रति क्विंटलहुन कमी असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता मागील जवळपास महिनाभरापासून टिकून असलेले तूर दर उतरणीला लागल्याने शेतकऱ्यांना मात्र चिंता सतावत आहे.

दरम्यान, तुरीच्या दरात (Tur Bajar Bhav) झालेली ही घसरण राज्यात सुरु असलेल्या पावसाच्या वातावरणामुळे झाली असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. पावसाचे वातावरण निवळताच तूर दराला पुन्हा झळाळी मिळेल. बाजारात सध्या तुरीची आवक घटली असून, सरकारकडून आयातही सीमित करण्यात आली आहे. परिणामी आगामी काळात सध्या असलेले तुरीचे दर कायम राहतील, असा आडाखा जाणकारांकडून बांधला जात आहे.

error: Content is protected !!