हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तूर (Tur Bajar Bhav) कापणीची लगबग सुरु असून, नवीन तूर हळूहळू बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता तुरीच्या दराला उत्तरती कळा लागल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (29 डिसेंबर) अकोला बाजार समितीत तुरीला असणारा कमाल 9800 रुपये प्रति क्विंटल दर आज कमाल 9300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे. राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही आज तुरीच्या दरात (Tur Bajar Bhav) काहीशी घसरण पहायला मिळाली.
या समित्यांमध्ये सर्वाधिक दर (Tur Bajar Bhav Today 1 Jan 2023)
अकोला बाजार समितीत आज तुरीची 294 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9300 ते किमान 6200 रुपये तर सरासरी 8250 रुपये प्रति क्विंटल, वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत आज तुरीची 410 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9010 ते किमान 7200 रुपये तर सरासरी 8310 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज तुरीची 25 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9000 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज तुरीची 25 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9000 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
इतर बाजार समित्यांमधील दर
शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने रोजचे तूर पिकाचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अॅप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. जालना बाजार समितीत आज तुरीची 3999 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8875 ते किमान 6800 रुपये तर सरासरी 8550 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील दुधणी बाजार समितीत आज तुरीची 1594 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8800 ते किमान 7600 रुपये तर सरासरी 8100 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ बाजार समितीत आज तुरीची 24 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8700 ते किमान 6900 रुपये तर सरासरी 7800 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत आज तुरीची 60 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8650 ते किमान 8050 रुपये तर सरासरी 8250 रुपये प्रति क्विंटल, अक्कलकोट बाजार समितीत आज तुरीची 1016 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8565 ते किमान 7901 रुपये तर सरासरी 8200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
दरम्यान, राज्यातील बाजार समित्यांमधील सरासरी दर (Tur Bajar Bhav) 7000 ते 8500 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यंदा तुरीची वाढ झाली नसून, शेंगा पोखरणाऱ्या अळीचाही प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.