Tur Bajar Bhav : तूर दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दर घसरणीमुळे (Tur Bajar Bhav) तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संतापाला सामोरे जावे लागत होते. मात्र आता तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ झाली आहे. अल्प का होईना वाढ झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत तुरीला सर्वाधिक कमाल 9605 रुपये प्रति क्विंटल इतका दर (Tur Bajar Bhav) मिळाला आहे.

सर्वाधिक दर मिळालेल्या बाजार समित्या (Tur Bajar Bhav Today 11 Jan 2024)

कारंजा बाजार समितीत आज तुरीची (Tur Bajar Bhav) 650 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9605 ते किमान 7705 तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज तुरीची 878 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9495 ते किमान 6500 तर सरासरी 8500 रुपये प्रति क्विंटल, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर बाजार समितीत आज तुरीची 220 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9350 ते किमान 7700 तर सरासरी 8700 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज तुरीची 307 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9249 ते किमान 6500 तर सरासरी 8663 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने रोजचे तूर बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर बाजार समितीत आज तुरीची 20 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9200 ते किमान 7955 तर सरासरी 8550 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ बाजार समितीत आज तुरीची 76 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9100 ते किमान 7805 तर सरासरी 8452 रुपये प्रति क्विंटल, अमरावती जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत आज तुरीची 105 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9011 ते किमान 7300 तर सरासरी 8155 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज तुरीची 366 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9026 ते किमान 8000 तर सरासरी 8770 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी तुरीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये चांगला दर मिळत होता. राज्यात 10,000 रुपयांच्या आसपास तुरीचे दर त्यावेळी पोहोचले होते. त्यानंतर तूर दरात झालेली घसरण ही कायम होती. मात्र आता तूर दरात काहीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये हसू फुलले असून, तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!