हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्याच्या शेवटी तुरीच्या दरात (Tur Bajar Bhav) काहीशी घट दिसून आली होती. मात्र, आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समितीत तुरीला कमाल 12500 ते किमान 12000 रुपये तर सरासरी 12000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याशिवाय अकोला बाजार समितीतही आज तूर दरात क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे तूर दराचे (Tur Bajar Bhav) हिंदोळे सुरूच असून, चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायाला मिळते आहे.
कुठे मिळाला सर्वाधिक भाव? (Tur Bajar Bhav Today 12 Feb 2024)
अक्कलकोट (सोलापूर) बाजार समितीत (Tur Bajar Bhav) आज 195 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10545 ते किमान 10000 रुपये ते सरासरी 10200 रुपये प्रति क्विंटल, औराद शहाजानी (लातूर) बाजार समितीत आज 165 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10520 ते किमान 10100 रुपये ते सरासरी 10283 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज 800 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10400 ते किमान 9300 रुपये ते सरासरी 9850 रुपये प्रति क्विंटल, तुळजापूर (धाराशिव) बाजार समितीत आज 30 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10400 ते किमान 9000 रुपये ते सरासरी 10250 रुपये प्रति क्विंटल, दुधणी (सोलापूर) बाजार समितीत आज 514 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10490 ते किमान 9000 रुपये ते सरासरी 9745 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज 2991 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10300 ते किमान 9000 रुपये ते सरासरी 9975 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
मुरुम (धाराशिव) बाजार समितीत आज 290 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10330 ते किमान 9800 रुपये ते सरासरी 10065 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ बाजार समितीत आज 926 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10145 ते किमान 9300 रुपये ते सरासरी 9722 रुपये प्रति क्विंटल, चिखली (अमरावती) बाजार समितीत आज 783 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10200 ते किमान 8700 रुपये ते सरासरी 9450 रुपये प्रति क्विंटल, औसा (लातूर) बाजार समितीत आज 110 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10401 ते किमान 9051 रुपये ते सरासरी 10109 रुपये प्रति क्विंटल, चाकूर (लातूर) बाजार समितीत आज 38 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10461 ते किमान 10100 रुपये ते सरासरी 10323 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
आज दरात पुन्हा सुधारणा
सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये तूर काढणीने वेग घेतला आहे. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण होते. ज्यामुळे मागील आठवडयाच्या शेवटी तूर दर (Tur Bajar Bhav) काहीसी नरमले होते. मात्र, आज त्यात पुन्हा सुधारणा झाली आहे. आधीच मिचोंग चक्रीवादळाचा फटका आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण यामुळे राज्यात तूर पिकाला फटका बसला होता. मिचोंग चक्रीवादळादरम्यान अनेक भागात तुरीची फुल गळ झाली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसला. मात्र, सध्या तुरीला चांगला दर मिळत असल्याने तूर उत्पादकांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत आहे.