हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तुरीचे दर (Tur Bajar Bhav) चांगलेच तेजीत पाहायला मिळत होते. मात्र, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तूर दर 10 हजारांच्या खाली घसरले आहे. काही निवडक बाजार समित्यांमध्ये आज तुरीला 10 हजारांच्या वरती दर मिळाला आहे. नागपूर बाजार समितीत आज तुरीला उच्चांकी कमाल 10400 ते सरासरी 10050 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे आज अचानक झालेल्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तूर विक्रीबाबत (Tur Bajar Bhav) संभ्रम अवस्था दिसून आली.
10 हजाराच्या वरती दर कुठे? (Tur Bajar Bhav Today 13 Feb 2024)
दुधणी (सोलापूर) बाजार समितीत आज तुरीची (Tur Bajar Bhav) 505 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10255 ते किमान 9700 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मुरुम (धाराशिव) बाजार समितीत आज तुरीची 330 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10200 ते किमान 9500 रुपये तर सरासरी 9850 रुपये प्रति क्विंटल, कळंब (यवतमाळ) बाजार समितीत आज तुरीची 160 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10100 ते किमान 9750 रुपये तर सरासरी 9800 रुपये प्रति क्विंटल, कारंजा (अकोला) बाजार समितीत आज तुरीची 3600 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10095 ते किमान 8700 रुपये तर सरासरी 9395 रुपये प्रति क्विंटल, गेवराई (बीड) बाजार समितीत आज तुरीची 191 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10090 ते किमान 8500 रुपये तर सरासरी 9400 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज तुरीची 715 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10050 ते किमान 8900 रुपये तर सरासरी 9475 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज तुरीची 715 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10050 ते किमान 8900 रुपये तर सरासरी 9475 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
कमाल 10 हजार दर कुठे?
याशिवाय राहूरी-वांबोरी बाजार समितीत आज तुरीची 5 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 9700 रुपये तर सरासरी 9900 रुपये, तुळजापूर बाजार समितीत आज तुरीची 18 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 9500 रुपये तर सरासरी 9800 रुपये, बार्शी (सोलापूर) बाजार समितीत आज तुरीची 63 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 9000 रुपये तर सरासरी 9900 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज तुरीची 40 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 9800 रुपये तर सरासरी 9918 रुपये, जालना जिल्ह्यातील अंबड (वडी गोद्री) बाजार समितीत आज तुरीची 113 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 7000 रुपये दर मिळाला आहे.
अचानक दरात मोठी घसरण
मागील आठवड्यात काही निवडक बाजार समित्या वगळता जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीचे कमाल दर (Tur Bajar Bhav) 10,000 रुपयांच्या वरती पोहचले होते. मात्र आज वरती नमूद असलेल्या बाजार समित्या वगळता बाकी सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर 10 हजारांच्या खाली घसरले आहेत. मागील तीन ते चार दिवसांपासून तूर दर कमी-जास्त होताना दिसत होते. मात्र, आज अचानक दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता ऐन तूर काढणी हंगामात दरात आणखी घसरण झाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.