Tur Bajar Bhav : तुरीने गाठला 10,100 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली बाजार समितीत आज तूर दरात (Tur Bajar Bhav) कमालीचा वाढ झाली असून, त्या ठिकाणी आज राज्यातील सर्वाधिक कमाल 10100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर बुधवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बझार बाजार समितीत तूर दराने कमाल 10011 रुपये प्रति क्विंटलपर्यंत उसळी घेतली होती. त्यामुळे हळूहळू का होईना परंतु तूर दरात सुधारणा (Tur Bajar Bhav) होत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सर्वाधिक दर मिळालेल्या बाजार समित्या (Tur Bajar Bhav Today 18 Jan 2024)

धाराशिव जिल्ह्यातील मुरुम बाजार समितीत आज तुरीची 392 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9866 ते किमान 9050 तर सरासरी 9458 रुपये प्रति क्विंटल, वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत आज तुरीची 1500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9850 ते किमान 8000 तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज तुरीची 1438 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9780 ते किमान 8200 तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत आज तुरीची 204 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9700 ते किमान 8405 तर सरासरी 9300 रुपये प्रति क्विंटल, बीड जिल्ह्यातील गेवराई बाजार समितीत आज तुरीची 221 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9611 ते किमान 9000 तर सरासरी 9300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अशाच पद्धतीने रोजचे तूर बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता.

व्यापाऱ्यांकडून मागणीत वाढ

याशिवाय आज राज्यातील राहूरी -वांबोरी, पैठण, चोपडा, चिखली, नागपूर, जिंतूर, मुर्तीजापूर, अंबड, परतूर, तुळजापूर, सेनगाव, सेलू, जळकोट, छत्रपती संभाजीनगर, बीड, शेवगाव – भोदेगाव, देउळगाव राजा, पाथरी या बाजार समित्यांमध्येही तुरीला कमाल 9000 रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर (Tur Bajar Bhav) मिळाला आहे. दरम्यान, सरकारी तूर खरेदी सुरु होणार असल्याने व्यापाऱ्यांकडून अचानक मागणीत वाढ झाली आहे. परिणामी, मागील आठवड्यापासून तुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

आणखी दरवाढीची शक्यता

यावर्षी खरिपात पाऊस पाहिजे तसा बरसलेला नाही. त्यामुळे यंदा तूर उत्पादनात घटीची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात बाजार समित्यांमध्ये आवक कमी होऊन, दर वाढण्याची शक्यता आहे. अशातच केंद्र सरकारही आपली सरकारी खरेदी सुरु करणार आहे. परिणामी तुरीचे दर आगामी काळात आणखी वाढलेले पाहायला मिळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी घाई न केलेलीच योग्य असणार आहे.

error: Content is protected !!