Tur Bajar Bhav : ‘या’ बाजार समित्यांमध्ये तुरीला 10,000 रुपये दर; वाचा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर (Tur Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, आज जवळपास 5 बाजार समित्यांमध्ये तूर दराने 10,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. लातूर, अकोला, नागपूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम या पाच बाजार समित्यांमध्ये तुरीला आज 10 हजार रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर मिळाला. आज आठ्वड्याचा शेवटचा दिवस असल्याने बऱ्याच बाजार समित्यांमध्ये, काहीशा चढ्या दराने तूर (Tur Bajar Bhav) खरेदी झालेली पाहायला मिळाली. मात्र, पुढील आठवड्यात ही तेजी अशीच कायम राहणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दहा हजारी बाजार समित्या (Tur Bajar Bhav Today 20 Jan 2024)

अकोला बाजार समितीत (Tur Bajar Bhav) आज तुरीची 1855 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10285 ते किमान 7400 तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज तुरीची 2280 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10211 ते किमान 8500 तर सरासरी 9783 रुपये प्रति क्विंटल, लातूर बाजार समितीत आज तुरीची 6504 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10100 ते किमान 9601 तर सरासरी 9700 रुपये प्रति क्विंटल, बीड बाजार समितीत आज तुरीची 102 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10100 ते किमान 7010 तर सरासरी 9538 रुपये प्रति क्विंटल, उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम बाजार समितीत आज तुरीची 2001 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10005 ते किमान 9200 तर सरासरी 9603 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

9500 च्या वरती दर असलेल्या समित्या

सोलापूर बाजार समितीत आज तुरीची 254 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9850 ते किमान 8460 तर सरासरी 9500 रुपये प्रति क्विंटल, अमरावती जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत आज तुरीची 500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9800 ते किमान 7600 तर सरासरी 8700 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज तुरीची 340 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9760 ते किमान 8411 तर सरासरी 9220 रुपये प्रति क्विंटल, तुळजापूर बाजार समितीत आज तुरीची 42 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9700 ते किमान 9000 तर सरासरी 9500 रुपये प्रति क्विंटल, देउळगाव राजा बाजार समितीत आज तुरीची 18 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9600 ते किमान 8000 तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याशिवाय शेवगाव (अहमदनगर), सेनगाव (हिंगोली), हिंगोली (खानेगाव नाका), अमरावती या बाजार समित्यांमध्ये कमाल 9500 रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर मिळाला आहे.

अशाच पद्धतीने रोजचे तुरीचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता.

11 हजाराचा टप्पा ओलांडणार

केंद्र सरकारकडून लवकरच तूर खरेदी (Tur Bajar Bhav) सुरु होऊ शकते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून तुरीला मागणी वाढली आहे. अशातच यावर्षी झालेला कमी पाऊस आणि नोव्हेंबरच्या शेवटी झालेला अवकाळी पाऊस यामुळे तूर पिकाला फटका बसला. काही भागात तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी एकूणच परिस्थिती पाहता तुरीचे दर लवकरच 11,000 रुपये प्रति क्विंटल देखील टप्पा ओलांडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!