हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील महिनाभरात तूर (Tur Bajar Bhav) आयातीसाठी अनेक देशांसोबत बोलणी केली. परिणामी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुरीचा असणारा 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल दर सध्या सरासरी 8 ते 9 हजारांपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळत आहे. आज तुरीला प्रमुख बाजार समिती असलेल्या लातूर बाजार समितीत कमाल 10,001 ते किमान 8770 रुपये तर सरासरी 9850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून, त्या ठिकाणी सर्वाधिक 1276 क्विंटल तुरीची (Tur Bajar Bhav) आवक झाली आहे.
आजचे बाजार भाव (Tur Bajar Bhav 23 Dec 2023)
सोलापूर जिल्ह्यातील दुधनी बाजार समितीत आज तुरीची 632 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10,305 ते किमान 9200 रुपये तर सरासरी 9700 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज तुरीची 409 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9550 ते किमान 6701 रुपये तर सरासरी 8475 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज तुरीची 3 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9000 ते किमान 8500 रुपये तर सरासरी 8875 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत आज तुरीची 349 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9900 ते किमान 8500 रुपये तर सरासरी 9200 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज तुरीची 104 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9500 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 8500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
अमरावती बाजार समितीत आज तुरीची (Tur Bajar Bhav) 69 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9500 ते किमान 9000 रुपये तर सरासरी 9250 रुपये प्रति क्विंटल, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव बाजार समितीत आज तुरीची 304 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8400 ते किमान 7500 रुपये तर सरासरी 8400 रुपये प्रति क्विंटल, पाथर्डी येथील बाजार समितीत आज तुरीची 160 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8500 ते किमान 7200 रुपये तर सरासरी 7700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
नवीन तुरीची आवक
यावर्षी महाराष्ट्र व कर्नाटकात तुरीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. मात्र खरीप हंगामातील नवीन तुरीची आवक काही प्रमाणात सुरू झाली असून, या नवीन तुरीला प्रति क्विंटलला 9000 हजाराच्या आसपास दर मिळत आहे. सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळत असला तरी उत्पादन कमी असल्याने त्याचा किती फायदा बळीराजाला होईल? हे जानेवारी महिन्यात जेव्हा पूर्ण क्षमतेने बाजारात तूर दाखल होईल त्यावेळीच लक्षात येईल. मात्र सध्या गेल्या दोन ते तीन महिन्यांतील निच्चांकी दर मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.