हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरवाढीने (Tur Bajar Bhav) चांगलाच जोर धरला असून, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांनी 10 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. अकोला व जालना या दोन बाजार समित्यांमध्ये तुरीला सर्वाधिक 10550 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. त्यामुळे आता हळूहळू का होईना? तुरीच्या दराने वाढीचा रोख धरल्याने शेतकरी सुखावले आहे. दोन दिवसांपूर्वी चालू आठवड्याच्या सुरुवातीच्या दराच्या तुलनेत तुरीचे दर (Tur Bajar Bhav) काहीसे कमी झाले होते. मात्र आज त्यात पुन्हा सुधारणा झाली आहे.
सर्वाधिक दर कुठे? (Tur Bajar Bhav Today 27 Jan 2024)
जालना बाजार समितीत आज पांढऱ्या तुरीची (Tur Bajar Bhav) 1704 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10550 ते किमान 7711 तर सरासरी 9800 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज लाल तुरीची 2205 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10550 ते किमान 8605 तर सरासरी 9750 रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीत आज लाल तुरीची 4781 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10315 ते किमान 8000 तर सरासरी 8800 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज लाल तुरीची 4515 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10300 ते किमान 8500 तर सरासरी 9850 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज लाल तुरीची 600 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10250 ते किमान 9300 तर सरासरी 9775 रुपये प्रति क्विंटल, बीड जिल्ह्यातील गेवराई बाजार समितीत आज लाल तुरीची 150 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10150 ते किमान 9200 तर सरासरी 9900 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील दुधणी बाजार समितीत आज लाल तुरीची 1453 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10090 ते किमान 9150 तर सरासरी 9620 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज लाल तुरीची 2376 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10099 ते किमान 8500 तर सरासरी 9299 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
दरवाढीमुळे शेतकऱ्यांना आधार
दरम्यान, अहमदनगर, राहूरी-वांबोरी, मुर्तीजापूर, तेल्हारा, बार्शी -वैराग, भोकरदन, जामखेड या बाजार समित्यांनी देखील आज दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. तर राज्यातील उर्वरित सर्वच बाजार समित्यांमध्ये आज कमाल 9500 ते 9999 या दरम्यान असलेली दराची रेंज कायम होती. सध्या कांदा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दर घसरणीने उमेद कमी झाली आहे. मात्र, तुरीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना दरवाढीमुळे काहीसा आधार मिळाला आहे.