हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर दरात (Tur Bajar Bhav) सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये तूर दर जवळपास 10 टक्क्यांनी घसरले आहेत. तर जालना बाजार समित्यांमध्ये मात्र पांढऱ्या तुरीचे दर 9000 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. लाल तुरीच्या दरात मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज सर्वच बाजार समित्यांमध्ये सरासरी 7151 ते 8300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घट (Tur Bajar Bhav) नोंदवली गेली आहे.
या समित्यांमध्ये सर्वाधिक दर (Tur Bajar Bhav Today 3 Jan 2023)
वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत (Tur Bajar Bhav) आज तुरीची 600 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9050 ते किमान 7150 रुपये तर सरासरी 8355 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील दुधणी बाजार समितीत आज तुरीची 1287 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8930 ते किमान 7700 रुपये तर सरासरी 8300 रुपये प्रति क्विंटल, धाराशिव जिल्ह्यातील मुरुम बाजार समितीत आज तुरीची 1299 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8916 ते किमान 7500 रुपये तर सरासरी 8208 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज तुरीची 384 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8750 ते किमान 6200 रुपये तर सरासरी 8000 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत आज तुरीची 521 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8610 ते किमान 7700 रुपये तर सरासरी 8385 रुपये प्रति क्विंटल, जालना जिल्ह्यातील अंबड बाजार समितीत आज तुरीची 37 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8500 ते किमान 5800 रुपये तर सरासरी 8051 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील देवणी बाजार समितीत आज तुरीची 31 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8511 ते किमान 7900 रुपये तर सरासरी 8205 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने रोजचे तुरीचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. जळगाव जिल्ह्यातील चोपडा बाजार समितीत आज तुरीची 180 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8451 ते किमान 7901 रुपये तर सरासरी 8000 रुपये प्रति क्विंटल, पैठण बाजार समितीत आज तुरीची 180 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8220 ते किमान 7450 रुपये तर सरासरी 8021 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज तुरीची 82 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8100 ते किमान 7400 रुपये तर सरासरी 7750 रुपये प्रति क्विंटल, निलंगा बाजार समितीत आज तुरीची 260 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8491 ते किमान 8200 रुपये तर सरासरी 8300 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज तुरीची 53 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7251 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7188 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
खरेदीस व्यापाऱ्यांची असमर्थता
नवीन तुरीची आवक वाढल्याने दरात घसरण (Tur Bajar Bhav) झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यातच केंद्र सरकारकडून म्यानमारसोबत झालेल्या तूर आयात करारानुसार या महिन्यात म्यानमारची तूर बाजारात येणार आहे. त्यामुळे सावधानता म्हणून व्यापारी अधिक तूर खरेदी करण्यास असमर्थता दर्शवत आहे. यावर्षी देशात पाऊस कमी प्रमाणात झाला असला तरीही यावर्षी देशात 34.21 लाख टन तूर उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत थोडे अधिक आहे.