Tur Bajar Bhav : तुरीचे दर 11,000 रुपयांच्या उंबरठ्यावर; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुरीच्या दराने आपली घोडदौड सुरूच ठेवली असून, आज जालना बाजार समितीत तूर दराने (Tur Bajar Bhav) 11000 च्या उंबरठ्यापर्यंत मजली मारली आहे. जालना बाजार समितीत आज पांढऱ्या तुरीला कमाल 10799 रुपये तर लाल तुरीला कमाल 10412 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. महिनाभरापूर्वी 8000 ते 9000 रुपये प्रति क्विंटल विकल्या जाणाऱ्या तुर दराचा (Tur Bajar Bhav) चढता आलेख सुरु झाल्याने, उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

राज्यात सर्वाधिक दर कुठे? (Tur Bajar Bhav Today 31 Jan 2024)

जालना बाजार समितीत आज पांढऱ्या तुरीची (Tur Bajar Bhav) 2197 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10799 ते किमान 8000 रुपये तर सरासरी 10100 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज तुरीची 2062 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10310 ते किमान 8000 रुपये तर सरासरी 9600 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज तुरीची 157 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10338 ते किमान 8600 रुपये तर सरासरी 9900 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बाजार समितीत आज तुरीची 66 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10252 ते किमान 8000 रुपये तर सरासरी 10200 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज तुरीची 3304 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10211 ते किमान 8500 रुपये तर सरासरी 9783 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील दुधणी बाजार समितीत आज तुरीची 506 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10150 ते किमान 8800 रुपये तर सरासरी 9500 रुपये प्रति क्विंटल, करमाळा बाजार समितीत आज तुरीची 137 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10211 ते किमान 9600 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आणखी वाढ होण्याची शक्यता

रोजचे तुरीचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. याशिवाय लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी, चाकूर, जळकोट, औराद शहाजानी; बीड जिल्ह्यातील आंबेजोबाई, गेवराई; जळगाव, अमरावती, हिंगोली, वाशीम जिल्ह्यातील कारंजा, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा या बाजार समित्यांमध्ये तूर दराने 10 हजारी घोडदौड कायम ठेवली आहे. तर उर्वरित बाजारसमित्यांमध्ये तूर 10 हजारांच्या खाली कायम आहे. दरम्यान, 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हमीभावाने तूर खरेदीसाठी पोर्टल सुरु केले आहे. ही बाब समोर येताच व्यापाऱ्यांकडून अचानक मागणी वाढल्याने दरात ही वाढ पाहायला मिळत आहे, तसेच तूर दरामध्ये आणखी वाढ होऊन 11 ते 12 हजारांच्या दरम्यान ते जाऊ शकतात, असा अंदाज बाजार विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!