Tur Bajar Bhav : तूर दरात तेजी कायम, कापसाची घसरगुंडी; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांचा तूर काढणीचा हंगाम जोरात सुरु आहे. अशातच तूर दर (Tur Bajar Bhav) शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे. सध्याच्या घडीला बाजार समित्यांमध्ये हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. याउलट हंगामातील सुरुवातीलाच तूर दराने तेजी पकडल्याने तूर उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर (Tur Bajar Bhav) तेजीत असल्याचे पाहायला मिळाले. तुरीची प्रमुख बाजार समितीत असलेल्या अकोला बाजार आज लाल तुरीला उच्चांकी 10800 रुपये प्रति क्विंटल, तर जालना बाजार समितीत पांढऱ्या तुरीला 10900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

सर्वाधिक दर कुठे? (Tur Bajar Bhav Today 6 Feb 2024 Maharashtra)

कारंजा (अकोला) बाजार समितीत आज तुरीची (Tur Bajar Bhav) 2200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10635 ते किमान 9000 तर सरासरी 10205 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मलकापूर (बुलढाणा) बाजार समितीत आज तुरीची 3438 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10625 ते किमान 9025 तर सरासरी 9600 रूपये, चाकूर (लातूर) बाजार समितीत आज तुरीची 44 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10601 ते किमान 10041 तर सरासरी 10401 रूपये, हिंगोली बाजार समितीत आज तुरीची 660 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10600 ते किमान 9800 तर सरासरी 10200 रूपये, हिंगणघाट (वर्धा) बाजार समितीत आज तुरीची 4819 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10605 ते किमान 7800 तर सरासरी 8700 रूपये, रिसोड (वाशीम) बाजार समितीत आज तुरीची 2100 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10600 ते किमान 9540 तर सरासरी 10050 रूपये, नागपूर बाजार समितीत आज तुरीची 5441 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10555 ते किमान 9000 तर सरासरी 10166 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर उर्वरित बाजार समित्यांमध्ये काही निवडक बाजार समित्या वगळता तुरीचे दर 10000 ते 10500 रूपये प्रति क्विंटलच्या दरम्यान कायम आहे.

कापसाचे आजचे बाजारभाव

दरम्यान, राज्यातील अकोला (बोरगावमंजू) या एकमेव बाजार समितीत आज कापसाला हमीभावाच्या वरती दर मिळाला आहे. त्या ठिकाणी आज 127 क्विंटल कापूस आवक झाली असून, कमाल 7208 ते किमान 6700 तर सरासरी 6954 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. याव्यतिरिक्त अन्य सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाला आज कमाल 6600 ते 6900 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळाला आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेला 7020 रुपये प्रति क्विंटल हा हमीभावाचा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

error: Content is protected !!