हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात तुरीच्या दरात (Tur Bajar Bhav) आज काहीशी घसरण झाली आहे. मंगळवारी (ता.6) अकोला येथे तुरीचे दर 10800 रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, आज अकोला बाजार समितीत 2995 क्विंटल आवक खाली असून, कमाल 10455 ते किमान 8700 रुपये तर सरासरी 9650 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण नोंदवली गेली आहे. तर राज्यात आज दुधणी (सोलापूर) या ठिकाणी तुरीला सर्वोच्च 10560 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील तूर दरात (Tur Bajar Bhav) सध्या काहीसा चढ-उतार पाहायला मिळत आहे.
सर्वाधिक दर कुठे? (Tur Bajar Bhav Today 9 Feb 2024)
दुधणी (सोलापूर) बाजार (Tur Bajar Bhav) समितीत आज 291 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10560 ते किमान 9200 रुपये तर सरासरी 9880 रुपये, तुळजापूर (धाराशिव) बाजार समितीत आज 26 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10500 ते किमान 9500 रुपये तर सरासरी 10100 रुपये, सेलू (परभणी) बाजार समितीत आज 664 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10500 ते किमान 9100 रुपये तर सरासरी 9900 रुपये, सोलापूर बाजार समितीत आज 114 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10415 ते किमान 9500 रुपये तर सरासरी 9660 रुपये, नागपूर बाजार समितीत आज 4618 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10411 ते किमान 9200 रुपये तर सरासरी 10108 रुपये, वाशीम बाजार समितीत आज 3000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10400 ते किमान 9100 रुपये तर सरासरी 9500 रुपये, यवतमाळ बाजार समितीत आज 668 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10400 ते किमान 9200 रुपये तर सरासरी 9800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
कारंजा (वाशीम) बाजार समितीत आज 3500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10350 ते किमान 8900 रुपये तर सरासरी 9960 रुपये, अमरावती बाजार समितीत आज 12972 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10300 ते किमान 9200 रुपये तर सरासरी 9750 रुपये, दिग्रस (यवतमाळ) बाजार समितीत आज 395 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10300 ते किमान 9500 रुपये तर सरासरी 9935 रुपये, चिखली (अमरावती) बाजार समितीत आज 664 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10200 ते किमान 8900 रुपये तर सरासरी 9550 रुपये दर मिळाला आहे. याशिवाय मालेगाव (वाशिम), मुर्तीजापूर (अकोला), वणी (यवतमाळ), पालम (परभणी), आष्टी (वर्धा), छत्रपती संभाजीनगर, जामखेड (अहमदनगर), करमाळा (सोलापूर) या बाजार समित्यांमध्ये तुरीला १० हजारांच्या वरती दर कायम आहे. तर अन्य बाजार समित्यांमध्ये तुरीचा दर हा 10 हजारांच्या खाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
क्विंटलमागे 300 ते 350 रुपये घट
अशाच पद्धतीने रोजचे तुरीचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरात (Tur Bajar Bhav) सातत्याने वाढ पाहायला मिळत होती. आज मात्र राज्यात काही ठिकाणी तुरीचे दर ३०० ते ३५० रुपये प्रति क्विंटलने घसरले आहे. त्यामुळे आज झालेल्या घसरणीनंतर तूर दर पुन्हा उसळी घेणार का? किंवा मग दरात झालेली ही घसरण कायम राहणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.