Tur Dal Procurement Portal: अमित शहांच्या हस्ते तूर डाळ खरेदी पोर्टलचे उद्घाटन, डाळ उत्पादनात देशाला स्वावलंबी करण्याचे लक्ष्य!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुरूवारी तूर डाळ खरेदी पोर्टलचे (Tur Dal Procurement Portal) उद्घाटन केले आहे. या पोर्टद्वारा शेतकरी किमान आधारभूत किमतीवर किंवा बाजारभावाने नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला (NCCF) त्यांच्या मालाची नोंदणी आणि विक्री करू शकतात. उडीद आणि मसूर तसेच मका उत्पादक शेतकर्‍यांसाठीही अशीच सुविधा भविष्यात सुरू केली जाईल, असे या वेळी बोलताना श्री. अमित शहा यांनी म्हटले.

यावेळी थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे 25 शेतकर्‍यांना पोर्टद्वारा (Tur Dal Procurement Portal) त्यांनी तूर विक्रीसाठी देय म्हणून  सुमारे 68 लाख रुपये हस्तांतरित केले.

नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) बफर स्टॉक राखण्यासाठी सरकारच्या वतीने डाळींची खरेदी करतात.

“पेरणीपूर्वी तूर उत्पादक शेतकरी त्यांचे उत्पादन नाफेड आणि एनसीसीएफला किमान आधारभूत किंमतीवर (MSP) विकण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करू शकतात. नोंदणीकृत तूर शेतकर्‍यांकडे नाफेड/एनसीसीएफ किंवा खुल्या बाजारात विकण्याचा पर्याय असेल” तसेच समजा तुरीची खुल्या बाजारातील किंमत MSP पेक्षा जास्त राहिली, तर त्या बाबतीत सरासरी दर सुत्राद्वारा काढण्यात येईल असेही पोर्टल (Tur Dal Procurement Portal) उद्घाटनानंतर त्यांनी सांगितले.

शाह पुढे म्हणाले की, अधिक शेतकरी कडधान्य शेती करत नाहीत कारण किमतीची खात्री नाही. पोर्टलद्वारे खरेदी केल्याने, या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रात मोठी सुधारणा होईल आणि कडधान्य उत्पादनात देश स्वावलंबी होण्यास मदत होईल.

“शेतकर्‍यांकडून तूर खरेदी केली जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी आहे,” असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

चना आणि मूग वगळता देश अजूनही काही प्रकारच्या डाळींच्या आयातीवर अवलंबून आहे, असे सांगून ते म्हणाले, “डिसेंबर 2027 पर्यंत देश डाळींच्या बाबतीत स्वावलंबी झाला पाहिजे. जानेवारी 2028 पासून आम्ही एक किलोही डाळ आयात करणार नाही. .”

त्यांनी प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) आणि प्रगतीशील शेतकर्‍यांना पोर्टलबद्दल (Tur Dal Procurement Portal) जागरूकता निर्माण करण्याचे आणि शेतकर्‍यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

किमान आधारभूत किंमतीत दोनदा वाढ झाल्यामुळे, कडधान्यांचे उत्पादन गेल्या दहा वर्षांत वाढून 2022-23 मध्ये 26.05 दशलक्ष टन झाले आहे, जे 2013-14 पीक वर्षात (जुलै-जून) 19.2 दशलक्ष टन होते. तथापि, कडधान्यांचे देशांतर्गत उत्पादन अजूनही वापराच्या तुलनेत कमी आहे आणि ते आयातीवर अवलंबून आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तूर डाळ खरेदी पोर्टल उद्घाटन (Tur Dal Procurement Portal) कार्यक्रमाला कृषी मंत्री अर्जुन मुंडा, सहकार राज्यमंत्री बी एल वर्मा आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री अश्विनी चौबे हे उपस्थित होते.

error: Content is protected !!