Tur Harbhara Rate : ब्राझीलमधून देशात तूर, हरभऱ्याच्या आयातीची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी भारताने मोझांबिक, मलावी आणि म्यानमार या देशांसोबत कडधान्य (Tur Harbhara Rate) आयातीसाठी सामंजस्य करार केले होते. मात्र आता देशांतर्गत डाळींचे दर स्थिर ठेवण्यासाठी आगामी काळात केंद्र सरकारकडून ब्राझीलमधून तूर आणि हरभऱ्याची आयात (Tur Harbhara Rate) केली जाऊ शकते. नुकतीच ब्राझील या देशाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या प्रतिनिधींसोबत याबाबत चर्चा केली असल्याचे समोर आले आहे.

देशात सध्या तूर आणि हरभरा दरातील देशांतर्गत तेजीच्या पार्श्वभूमीवर याबाबत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये ही चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. भारताला तूर आणि आणि हरभऱ्याची पूर्तता करण्यासाठी ब्राझील कटिबद्ध असल्याचे म्हणत संबंधित देशांच्या प्रतिनिधींनी या चर्चेदरम्यान आश्वस्त केले आहे. दरम्यान ही आयात केव्हा होईल? आणि किती प्रमाणात होईल? याबाबत सध्या काहीही माहिती समोर येऊ शकली नाही.

कडधान्यांचे प्रमुख पुरवठादार देश (Tur Harbhara Rate In India)

यावर्षी भारताने 2.13 दशलक्ष टन कडधान्ये (तूर,उडीद, हरभरा) आयात केली आहेत. यात प्रामुख्याने 1.08 दशलक्ष टन मसूर, 0.62 दशलक्ष टन तूर आणि 0.42 दशलक्ष टन उडीद आणि हरभरा आयात केला आहे. ही आयात भारताने प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, कॅनडा, म्यानमार, मोझांबिक, टांझानिया, सुदान आणि मलावी या देशांकडून केली आहे. या देशांवरील उडीद आणि तूर आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी ब्राझीलसोबत ही बोलणी झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यापूर्वी भारताने 2016 मध्ये मोझांबिक या देशासोबत पाच वर्षांसाठी वार्षिक ०.२ दशलक्ष टन तूर आयातीसाठी सामंजस्य करार केला होता. या कराराला सप्टेंबर 2021 मध्ये पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

दर नियंत्रणासाठी सरकारचा प्रयत्न

मागील आठवड्यात देशातील तूर, हरभरा आणि उडीद दरात मोठी वाढ नोंदवली गेली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात महागाई वाढू नये. तसेच या कडधान्यांचे दर निवडणूक काळात स्थिर ठेवण्यासाठी आणि अन्य कडधान्य पुरवठादार देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय आणि ब्राझीलच्या शिष्टमंडळात आयातीबाबत ही चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!