Tur Market Rate : तुरीच्या दरात मोठी घसरण; पहा ‘काय’ आहेत दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुरीचा बाजार सध्या सुस्त असल्याने देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात तुरीच्या दरात (Tur Market Rate) मोठी घसरण पाहायला मिळाली. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आणि उत्तरप्रदेशातील बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात तुरीच्या दरात (Tur Market Rate) 400 ते 1000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण नोंदवली गेली आहे.

महाराष्ट्रातील तुरीचे दर

महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात प्रति क्विंटलमागे 500 ते 900 रुपये इतकी घसरण नोंदवली गेली. सोलापूर बाजार समितीत तुरीला या आठवड्यात 9500 ते 11350 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीत तुरीला 11650 ते 11700 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत 11800 ते 11900 रुपये प्रति क्विंटल, लातूर बाजार समितीत 10700 रुपये प्रति क्विंटल तर अहमदनगर बाजार समितीत तुरीला 10800 ते 11000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

कर्नाटकातील तुरीचे दर (Tur Market Rate In India)

कर्नाटकमध्ये नवीन तुरीची अल्प प्रमाणात आवक होत असल्याने, या आठवड्यात तुरीच्या दरात 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण पाहायला मिळाली. गुलबर्गा बाजार समितीत तुरीला या आठवड्यात 10800 ते 11200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर बीदर बाजार समितीत तुरीला या आठवड्यात 9011 ते 11111 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

मध्यप्रदेश, छत्तीसगढ, उत्तरप्रदेशातील दर

मध्यप्रदेशातील बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात तुरीच्या दरात प्रति क्विंटलमागे 1000 रुपयांची घसरण झाली. मध्यप्रदेशातील कटनी बाजार समितीत तुरीला या आठवड्यात 11800 ते 11850 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथील बाजार समितीत तुरीच्या दरात या आठवड्यात प्रति क्विंटलमागे 500 रुपये घसरण झाली. रायपूर बाजार समितीत तुरीला या आठवड्यात 11900 ते 12100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. याशिवाय युपीतील कानपुर बाजार समितीत तुरीच्या दरात प्रति क्विंटलमागे 400 रुपये घसरण नोंदवली गेली. कानपुर बाजार समितीत तुरीला या आठवड्यात 11200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

तूर डाळीच्या दरातही घट

तुरीच्या दरातील घसरणीचा परिणाम तुरडाळीवरही दिसून आला. या आठवड्यात तूर डाळीच्या दरात प्रति क्विंटलमागे 400 रुपयांची घसरण नोंदवली गेली. दिल्ली येथे तुरडाळीला या आठवड्यात 16000 ते 17150 रुपये क्विंटल दर मिळाला. अकोला येथे तुरडाळीला 16000 ते 16800 रुपये प्रति क्विंटल, लातूर येथे तुरडाळीला 16500 ते 16700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे तुरडाळीला 15800 ते 16500 रुपये प्रति क्विंटल, तर कानपुर येथे तुरडाळीला 16200 ते 16600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

आयातीत तुरीच्या दरातही घट

मागणी घटल्याने आयातदारांनी या आठवड्यात आयातीत तुरीच्या दरातही प्रति क्विंटलमागे 200 ते 300 रुपये घट केली. ज्यामुळे मोज़ाम्बिक या देशातून आयात केलेल्या सफेद तुरीचा दर 9100 ते 9150 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरला. तर सुदान या देशातून आयात केलेल्या तुरीच्या दरात 11550 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली.

error: Content is protected !!