Tur Rate : जानेवारीमध्ये म्यानमारची तूर, उडीद भारतात येणार; 14 लाख टनांचा करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्याने (Tur Rate) मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने विविध देशांकडून तूर आयात करण्याचा सपाटा लावला आहे. आता भारत सरकारने म्यानमार सरकारसोबत 14 लाख टन तूर (Tur Rate) आणि उडीद आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत डाळींच्या वाढलेल्या किमतींमुळे केंद्र सरकारकडून हा निर्यात घेण्यात आला आहे. येत्या जानेवारी महिन्यामध्ये ही तूर आणि उडीद म्यानमारकडून भारताला मिळणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात असलेली 150 रुपये प्रति क्विंटल तूर डाळ (Tur Rate) सध्या बाजारात 155 रुपये किलोने बाजारात मिळत आहे. मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यावर्षी तूर डाळीच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. मागणीच्या तुलनेत अल्प साठा असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. मोझाम्बिक या देशाने करारनुसार शब्द पाळला नाही. त्यामुळे त्या ठिकाणाहून भारतात तूर येण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता सरकारकडून म्यानमार या देशाला साद घालण्याची वेळ आली आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात 4 लाख टन तूर डाळ तर 1 लाख टन उडीद डाळीची पहिली खेप म्यानमारकडून भारताला दिली जाणार आहे. तर उर्वरित 9 लाख टन डाळ टप्प्याटप्प्याने भारतात पाठवली जाणार आहे.

लागवडीखालील क्षेत्रात घट (Tur Rate Myanmar’s Tur Udid Comes January)

दरम्यान, यावर्षी देशातील तूर लागवडीखालील क्षेत्रात घट झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यावर्षीच्या खरीप हंगामात 2023 मध्ये 43.86 लाख हेक्टरवर तूर पिकाची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत देशात 46.12 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. यावर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे. मात्र असे असले तरी यावर्षी 2023-24 मध्ये तूर उत्पादन 34.21 लाख टन इतके होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या हंगामात 33.12 लाख टन इतके नोंदवले गेले होते.

error: Content is protected !!